लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्र समृद्धी महामार्गामुळे नागपूर ते मुंबई या दोन शहरातील अंतर कमी होणार आहे. या महामार्गाच्या माध्यमातून कृषी व औद्योगिक विकासाला मोठ्या प्रमाणात चालना मिळणार असून हा प्रकल्प प्राधान्याने पूर्ण करण्याच्या दृष्टीने हिंगणा तालुक्यातून सुरुवात झाली आहे. राज्यात सर्वाधिक ३० टक्के जमीन खरेदीचे काम पूर्ण झाले असून, येत्या एक महिन्यात ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल, असा विश्वास उपविभागीय महसूल अधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी व्यक्त केला.जिल्हा माहिती कार्यालयातर्फे गणेशोत्सवानिमित्त हिंगणा येथील तहसील कार्यालयाच्या सभागृहात संवाद पर्व आयोजित करण्यात आले होते. त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना कोळेकर बोलत होते. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मिलिंद शेंडे, जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर, जिल्हा पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष सुभाष वºहाडे, तहसीलदार प्रताप वाघमारे व्यासपीठावर उपस्थित होते. संचालन तहसीलदार प्रताप वाघमारे यांनी केले.अडीच लाख शेतकºयांना जमीन आरोग्य पत्रिकाकृषी उत्पादन दुप्पट करण्याच्या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमांतर्गत शेतकºयांना शेत जमिनीसंदर्भात आवश्यक असलेल्या घटक द्रव्यांची माहिती उपलब्ध व्हावी व त्यानुसार पिकांचे नियोजन करता यावे यासाठी शेतकºयांना मृद्र्रा आरोग्य पत्रिका देण्यात येत आहे. जिल्ह्यात अडीच लाख शेतकºयांना जमिनीची आरोग्य पत्रिका देण्यात आली असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मिलिंद शेंडे यांनी दिली.
समृद्धी महामार्गासाठी महिनाभरात जमीन खरेदी प्रक्रिया पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2017 1:16 AM
महाराष्ट्र समृद्धी महामार्गामुळे नागपूर ते मुंबई या दोन शहरातील अंतर कमी होणार आहे. या महामार्गाच्या माध्यमातून कृषी व औद्योगिक विकासाला मोठ्या प्रमाणात चालना मिळणार असून ....
ठळक मुद्देबाळासाहेब कोळेकर : राज्यात सर्वाधिक ३० टक्के काम