नागपूर : : विदर्भात कोरोना संसर्गाबाबत चिंता वाढली असताना आता मृत्यूच्या संख्येतही वाढ होताना दिसून येत आहे. शुक्रवारी ५९७२ नव्या रुग्णांची भर पडली तर, ६० रुग्णांचे जीव गेले आहेत. सर्वाधिक रुग्ण व मृत्यूची नोंद नागपूर जिल्ह्यात झाली. ३२५५ रुग्ण व ३५ मृत्यू झाले. सप्टेंबरनंतर ही सर्वाधिक मृत्यूसंख्या आहे. नागपूरनंतर बुलढाण्यात झपाट्याने रुग्ण वाढत आहेत. ७३२ रुग्ण व ३ बळी गेले. यवतमाळ जिल्ह्यात पुन्हा रुग्णसंख्या ५२६ झाली व ९ रुग्णांचे जीव गेले. अमरावती जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून रुग्णसंख्या स्थिर आहे. ३३६ रुग्ण व २ मृत्यूची नोंद झाली. अकोल्यात ३३१ रुग्ण व ५ तर, वाशिम जिल्ह्यात २०७ रुग्ण व २ मृत्यू झाले. नागपूर विभागात वर्धासोबतच आता चंद्रपूर व भंडारा जिल्ह्याने दैनंदिन रुग्णसंख्येची शंभरी ओलांडली. वर्धा जिल्ह्यात २५५ रुग्ण व ४ मृत्यू, चंद्रपूर जिल्ह्यात १२८ रुग्ण तर भंडारा जिल्ह्यात १०७ रुग्ण आढळून आले.
जिल्हा रुग्ण एकूण रुग्ण मृत्यू
नागपूर : ३२५५ : १८५७८७ : ३५
गडचिरोली :४८ : १००६८ : ००
वर्धा : २५५ : १५७०७ : ०४
भंडारा : १०७ : १४८३७ : ००
चंद्रपूर : १२८ : २५३९२ : ००
गोंदिया : ४७ : १४९४२ : ००
अमरावती :३३६ : ४४५५८ : ०२
अकोला :३३१ : २३४६६ : ५
बुलढाणा : ७३२ : २८५३७ : ०३
वाशिम :२०७ : १२३०२ : ०२
यवतमाळ : ५२६: २३७४० : ०९