शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
2
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
3
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
4
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
5
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
6
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
7
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
8
...म्हणून देशाची राजधानी दिल्लीतून दुसरीकडे हलवा, शशी थरूर यांनी दिला सल्ला
9
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
12
अजबच! सहा हजारांच्या लाच प्रकरणी सरकारी कर्मचाऱ्याला निवृत्तीनंतर ५ वर्षांनी शिक्षा
13
भारताचा पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीआधी मोठा धक्का; अंध T20 वर्ल्ड कपकडेही फिरवली पाठ
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
17
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
18
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
19
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

थोरल्याच्या वरातीआधीच धाकट्याची अंत्ययात्रा

By admin | Published: November 05, 2016 3:04 AM

ते दोघे तसे सख्खे भाऊ, पण जीवाभावाचे मित्र. लहानपणापासून अगदी मित्रासारखेच जगले.

नियतीचा अजब खेळ : भगत कुटुंबाचा आनंदसोहळा दु:खात बदललानागपूर : ते दोघे तसे सख्खे भाऊ, पण जीवाभावाचे मित्र. लहानपणापासून अगदी मित्रासारखेच जगले. लहानाचे मोठे झाले. मोठ्याचे नुकतेच लग्न जुळले. शनिवारचा लग्नसोहळाही ठरला. मोठ्या भावाच्या लग्नात काही कमी होऊ नये म्हणून लहान भावाने नियोजनाची सर्व जबाबदारी आपल्या अंगावर घेतली. मोठ्या उत्साहाने तो सर्व कामात लक्ष देत होता. लग्नघटिका आता काही तासांवर आली असताना नियतीने अचानक डाव साधला अन् मोठ्या भावाची वरात निघण्याआधीच हृदयविकाराने जीव गमावणाऱ्या लहान्याची अंत्ययात्रा काढावी लागली. हृदय हेलावून टाकणारा हा प्रसंग आज शुक्रवारी प्रभात कॉलनी नारा रोड येथील भगत कुटुंबावर गुदरला. मिलिंद भगत हे उत्तर नागपुरातील प्रभात कॉलनी नारा रोड येथे राहतात.ते निमखेड तारसा येथे बँक आॅफ इंडियाचे व्यवस्थापक आहेत. त्यांच्या पत्नी अ‍ॅड. रजनी भगत या जिल्हा न्यायालयात प्रॅक्टीस करतात. त्यांना चैतन्य व कुणाल ही दोन मुलं आहेत. मोठा चैतन्य राष्ट्रीय बँकेत अधिकारी आहे तर लहान कुणाल (२७) हा एमबीए करीत आहे. चौघांचे हे सुखी कुटुंब आहे. यातच चैतन्यचे स्नेहा नावाच्या मुलीशी लग्न ठरले. ५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता सातपुडा लॉन येथे लग्नसमारंभ आयोजित करण्यात आला होता. घरातील पहिलेच लग्न असल्याने मोठ्या थाटात हे लग्न करण्याची घरच्यांची योजना होती. लहान मुलगा कुणाल यात सर्वात पुढे होता. संपूर्ण आयोजनाची तयारी तो स्वत: पाहत होता. भावाचे लग्न असल्याने त्याचा कामाचा उत्साह सुद्धा ओसंडून वाहत होता. नातलग मंडळीही घरी पोहोचली होती. शुक्रवारी दुपारी ४.३० वाजता घरी परित्राण पाठ (पूजा) आयोजित करण्यात आली होती. परित्राण पाठमध्ये घरातील सर्वच मंडळी बसली होती. अचानक कुणालच्या छातीत कळ आली. काही कळायचा आत तो खाली कोसळला. त्याला लगेच एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले. परंतु त्यापूर्वीच त्याची प्राणज्योत मालवली. काही वेळापूर्वी आनंदात असलेल्या भगत कुटुंबावर एकदम शोककळा पसरली. त्याचा मृतदेह घरी आणण्यात आला तेव्हा भगत कुटुंबच नव्हे तर परिसरातील नागरिकांनाही अश्रू आवरणे कठीण झाले होते. अशा शोकाकूल वातावरणात कुणालवर सायंकाळी वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.