अफगाणिस्तानच्या महसूल विभागाचे अधिकारीनागपूर : राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी (एनएडीटी), नागपूर येथे आयोजित अफगाणिस्तानच्या महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांच्या १२ दिवसीय प्रशिक्षणाचा समारोप शुक्रवार, २४ फेब्रुवारीला दुपारी ३.३० वाजता होणार आहे. मुख्य अतिथी म्हणून मुंबईचे मुख्य आयकर आयुक्त विधू शेखर सिंघ आणि केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाचे संयुक्त सचिव सुब्बा रायडू हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहतील . राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी व काबूल येथील परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या भारतीय दूतावास कार्यालयाच्या वतीने या अभिनव प्रशिक्षण वर्गाचे प्रथमच करण्यात आले असून या प्रशिक्षणासाठी अफगाणिस्तानच्या महसूल विभागाचे ३३ अधिकारी सहभागी झाले होते. या प्रशिक्षणामध्ये कर-प्रशासनातील तत्त्व, भारतीय आयकर कायदा व आंतरराष्ट्रीय कर-प्रशासन याविषयीची माहिती, याशिवाय भारतीय रिझर्व्ह बँक व स्थानिक आयकर कार्यालयाला भेट, सेवाग्राम आश्रम, ताडोबा-अंधारी राष्ट्रीय उद्यान येथे सहल यासारख्या उपक्रमांचा समावेश होता. या समारोप समारंभाप्रसंगी सांस्कृतिक संध्येचे आयोजन राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीच्या सभागृहात सायंकाळी ७ वाजता होणार आहे.(प्रतिनिधी)
‘एनएडीटी’मध्ये अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणाचा समारोप आज
By admin | Published: February 24, 2017 3:08 AM