नागपूर : मातोश्री अंजनाबाई बहुउद्देशीय महिला विकास मंडळाच्या वतीने फिजिकल एज्युकेशन फाऊंडेशन ऑफ इंडिया पुरस्कृत ध्यानसाधना प्रशिक्षण अभ्यासक्रमाचा समारोप झाला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलसचिव डॉ. पुरणचंद्र मेश्राम अध्यक्षस्थानी होते. शिक्षणतज्ज्ञ श्रीहरी बोरीकर, पेफीचे राष्ट्रीय सचिव डॉ. पीयूष जैन, राष्ट्रीय योगा संस्थेचे अध्यक्ष डॉ. एम.एम. घारोटे, डॉ. राकेशकुमार शास्त्री, प्रा.डॉ. सी.डी. नाईक प्रमुख पाहुणे होते. एक महिन्याच्या योग आणि ध्यानसाधना शिबिरात ओमान या देशातील तसेच भारतातील महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, आसाम, अरुणाचल प्रदेश, बिहार, उत्तराखंड, छत्तीसगड, कर्नाटक इत्यादी राज्यातून सहभागी झालेल्या शिबिरार्थ्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या. यानंतर या अभ्यासक्रमादरम्यान योग, ध्यानसाधना, आहारशास्त्र, आयुर्वेद, निसर्गोपचार, इलेक्ट्रोहोमिओपॅथी, स्तन कर्करोग, तणाव व्यवस्थापन इत्यादी विषयांवर मार्गदर्शन करणारे संजय खोंडे, सचिन माथुरकर, श्रुती खोंडे, डॉ. संजय खालटकर, डॉ. ईशिका खालटकर, वैदेही इंगळे, डॉ. राजश्री पेंढारकर, डॉ. विनोद भुते, डॉ. विद्या लांजेवार, डॉ. दिनेश लांजेवार, डॉ. सी.डी. नाईक, डॉ. रोहिणी पाटील, डॉ. सुषमा देशमुख, डॉ. ललिता पुन्नया, डॉ. लीना बिरे-काळमेघ या सर्व मार्गदर्शकांचा सत्कार करण्यात आला. योग आणि प्रशिक्षण अभ्यासक्रमाचे एक महिन्याच्या कार्याचा आढावा वाचन डॉ. वंदना मेश्राम-इंगळे यांनी केले, संचालन डॉ. ललिता पुन्नय्या यांनी तर डॉ. सुभाष दाढे यांनी आभार मानले.
योग आणि ध्यानसाधना प्रशिक्षण शिबिराचा समारोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2021 4:09 AM