रामटेक : परमात्मा एक आनंदधाम व रामटेक नगर परिषदेच्या संयुक्त विद्यामाने रामटेक शहरात स्वच्छता अभियान व परमात्मा भगवत कृपा षष्ठी कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले हाेते. या कार्यक्रमाचा शुक्रवारी (दि. २७) शहरातील सुपर मार्केट येथे समाराेप करण्यात आला.
याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून आ. आशिष जयस्वाल, जिल्हा परिषद अध्यक्ष रश्मी बर्वे, नगराध्यक्ष दिलीप देशमुख, माजी नगराध्यक्ष नलिनी चौधरी, नगरसेवक दामोदर धोपटे, प्रहार संघटना जिल्हाप्रमुख रमेश कारमोरे, लक्ष्मण मेहर, विजय हटवार, माजी सरपंच योगिता गायकवाड, माजी नगरसेवक बिकेंद्र महाजन, सुनील देवगडे, बजरंग मेहर उपस्थित हाेते. या अभियानांतर्गत ६ ते २७ ऑगस्ट या काळात काेराेना, डेंग्यू, मलेरिया या आजाराबाबत तसेच व्यसनमुक्तीबाबत जनजागृती करण्यात आली असून, स्वच्छता अभियान राबविण्यात आले. कार्यक्रमाला सेवकांसह नागरिकांनी हजेरी लावली हाेती.