लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पेट्रोल-डिझेल दरवाढीचा मुद्दा सध्या देशात चांगलाच गाजत आहे. या दरवाढीविरोधात सर्वत्र विरोध सुरू आहे. शुक्रवारी नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री आ. जयंत पाटील यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलबंडी मोर्चा काढण्यात आला. यावेळी बैलबंडीवर दुचाकी वाहने वाहून पेट्रोल-डिझेल दरवाढीचा तीव्र निषेध करण्यात आला.दुपारी ४ वाजता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वात आकाशवाणी चौकातून या बैलबंडी मोर्चाला सुरुवात झाली. प्रदेशाध्यक्ष पाटील हे स्वत: बैलबंडी चालवत होते. त्यांच्यासोबत माजी मंत्री अनिल देशमुख, रमेश बंग, आ. प्रकाश गजभिये हे बैलबंडीवरून घोषणा देत होते. या मोर्चादरम्यान कार्यकर्त्यांनी केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात नारेबाजी करीत पेट्रोल-डिझेल दरवाढीचा निषेध केला. यानंतर शिष्टमंडळातर्फे जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांच्या माध्यमातून मख्यमंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आले. सातत्याने वाढत असलेल्या पेट्रोल-डिझेलची दरवाढ कमी करण्याची मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली. यावर लवकरात लवकर तोडगा न निघाल्यास भाजपा सरकारच्या विरोधात राज्यभरात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनाच्या माध्यमातून देण्यात आला. आंदोलनात महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, राजाभाऊ टांकसाळे, सलील देशमुख, अनिल अहीरकर, प्रवीण कुंटे पाटील, वेदप्रकाश आर्य आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.सामान्यांचा अंत पाहू नका : जयंत पाटील
बैलबंडीवर दुचाकी वाहून पेट्रोल-डिझेल दरवाढीचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 1:31 AM
पेट्रोल-डिझेल दरवाढीचा मुद्दा सध्या देशात चांगलाच गाजत आहे. या दरवाढीविरोधात सर्वत्र विरोध सुरू आहे. शुक्रवारी नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री आ. जयंत पाटील यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलबंडी मोर्चा काढण्यात आला. यावेळी बैलबंडीवर दुचाकी वाहने वाहून पेट्रोल-डिझेल दरवाढीचा तीव्र निषेध करण्यात आला.
ठळक मुद्देराष्ट्रवादी काँग्रेसची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक : प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वात मोर्चा