शहरं
Join us  
Trending Stories
1
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
2
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
3
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
4
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
5
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
7
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
8
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
9
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
10
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
12
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
13
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
14
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
15
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
16
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
17
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
18
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
19
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
20
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान

नागपूरसाठी रस्सीखेच, रामटेकसाठी वासनिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 12:40 AM

लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी काँग्रेसने आता सर्वच मतदारसंघात उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण हे टिळक भवन मुंबई येथे बैठका घेत आहे. शुक्रवारी विदर्भातील मतदारसंघांवर चर्चा झाली. नागपूरच्या उमेदवारीवरून काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा गटबाजी दिसून आली तर रामटेकसाठी मात्र मुकुल वासनिक यांचे एकमात्र नाव समोर आले.

ठळक मुद्देलोकसभा उमेदवारीसाठी काँग्रेसचे मंथन : मुंबईत समर्थकांकडून दावे

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी काँग्रेसने आता सर्वच मतदारसंघात उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण हे टिळक भवन मुंबई येथे बैठका घेत आहे. शुक्रवारी विदर्भातील मतदारसंघांवर चर्चा झाली. नागपूरच्या उमेदवारीवरून काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा गटबाजी दिसून आली तर रामटेकसाठी मात्र मुकुल वासनिक यांचे एकमात्र नाव समोर आले.शुक्रवारी मुंबईत झालेल्या बैठकीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अ.भा. काँग्रेस समितीचे सचिव आशिष दुआ, बी संदीप, मणिकराव ठाकरे, हर्षवर्धन पाटील,आरिफ नसीम खान आदी उपस्थित होते. नागपूर व रामटेक लोकसभा मतदारसंघाबाबत बैठकीत सविस्तर चर्चा झाली. काही नेत्यांना आपले मत मांडण्याची संधी देण्यात आली. या वेळी नागपूर लोकसभेसाठी विलास मुत्तेमवार, अविनाश पांडे, विकास ठाकरे, प्रफुल्ल गुडधे, डॉ. बबनराव तायवाडे, आशिष देशमुख आदींची नावे समोर आली. विशेष म्हणजे नाना पटोले यांच्या नावाची उघड शिफारस करणे सर्वांनीच टाळले. रामटेकसाठी मात्र मुकुल वासनिक यांचे एकमेव नाव चर्चेत आले. त्यामुळे नागपूरच्या उमेदवारीवरून काँग्रेसमध्ये रस्सीखेच होण्याची चिन्हे आहेत.बैठकीत शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांनी नागपुरातील काँग्रेसच्या स्थितीवर प्रकाश टाकला. त्यांनी माजी केंद्रीय राज्यमंत्री विलास मुत्तेमवार व अ.भा. काँग्रेस समितीचे महासचिव अविनाश पांडे यांचे नाव सुचविले. या दोन नेत्यांच्या बळावरच काँग्रेस नागपुरात भाजपाला टक्कर देऊ शकेल, असा दावा त्यांनी केला. प्रदेश सचिव उमाकांत अग्निहोत्री यांनी काँग्रेसने दुसऱ्या फळीतील नेत्यांना संधी देण्याची सूचना करीत विकास ठाकरे यांचे नाव सुचविले. प्रदेश सचिव अभिजित सपकाळ यांनी नगरसेवक प्रफुल्ल गुडधे हे इच्छुक असल्याचे सांगितले. भाजप सोडून काँग्रेसवासी झालेले आशिष देशमुख यांनीही स्वत: लढण्याची इच्छा व्यक्त केली. डॉ. बबनराव तायवाडे म्हणाले, विदर्भात ओबीसी समाज मोठ्या प्रमाणात असून पक्षाने प्रतिनिधित्व द्यावे. आपले ओबीसी समाजात काम आहे. पक्षाने याची दखल घ्यावी, असे सांगत त्यांनी स्वत:ची दावेदारी सादर केली.रामटेक लोकसभेच्या चर्चेत जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांनी सर्व पदाधिकाºयांनी एकमताने राष्ट्रीय महासचिव मुकुल वासनिक यांचे नाव निश्चित केले असल्याचे सांगितले. काँग्रेस नेते नाना गावंडे, सुनीता गावंडे, बाबुराव तिडके, कुंदा राऊत, प्रकाश वसू, आदींनीही वासनिक यांचेच नाव सुचविले. बैठकीला अनंतराव घारड, चंद्रपाल चौकसे, संजय मेश्राम, शकूर नागाणी आदी उपस्थित होते.तेली समाजाला एक तरी जागा द्याविदर्भातील तेली समाजाची संख्या लक्षात घेता लोकसभेच्या दहा जागांपैकी किमान एक जागा तेली समाजाला द्यावी, अशी मागणी अ‍ॅड. अभिजित वंजारी यांनी केली. चंद्रपूरमधून शांताराम पोटदुखे यांनी अनेक वर्ष लोकसभेत प्रतिनिधित्व केले आहे. मात्र, त्यानंतर तेली समाजाला कधीही लोकसभेची उमेदवारी देण्यात आलेली नाही. त्यामुळे यावेळी चंद्रपूर, वर्धा किंवा विदर्भातील कोणत्याही मतदारसंघात तेली समाजाच्या कार्यकर्त्याला उमेदवारी द्यावी, अशी मागणी वंजारी यांनी केली. संबंधित मागणीवर विचार करण्याचे आश्वासन नेत्यांनी दिले.

टॅग्स :congressकाँग्रेसElectionनिवडणूक