लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्र शासनाकडे प्रस्तावित असलेल्या ‘नॅशनल कमिशन फॉर इंडियन सिस्टीम आॅफ मेडिसीन’ (एनसीआयएसएम) या विधेयकातून ‘इंटिग्रेटेड’ हा शब्द वगळू नये, या मुख्य मागणीला घेऊन ‘नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन’च्या (निमा) डॉक्टरांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. अतिशय शांततेत निघालेल्या या मोर्चात शेकडो डॉक्टर सहभागी झाले होते.‘निमा’ संघटनेच्यावतीने गेल्या सहा महिन्यांपासून नव्या विधेयकातून ‘इंटिग्रेटेड’ हा शब्द वगळू नये यासाठी संघर्ष करीत आहे. हा शब्द वगळल्यास आयुर्वेद, युनानी डॉक्टरांना ग्रामीण भागात आरोग्य सेवा देणे कठीण होईल, याकडे ही संघटना लक्ष वेधत आहे. मात्र, शासन निर्णय घेत नसल्याचे पाहून शुक्रवारी मोर्चाचे हत्यार उपसले. सकाळी कस्तूरचंद पार्क मैदानातून मोर्चा काढण्यात आला. मोर्चाचे नेतृत्त्व डॉ. रवींद्र बोथरा, डॉ. प्रवीण डांगोरे, डॉ. शैलेश मानेकर, डॉ. मोहन येंडे व डॉ. नितीन वरघणे यांनी केले. कुठलीही घोषणा किंवा नारेबाजी न करता हा मोर्चा काढण्यात आला. डॉक्टरांच्या हातात मागण्यांचे फलक होते. कस्तूरचंद पार्कमधून निघालेला मोर्चा व्हेरायटी चौक, महाराज बाग चौक होऊन पुन्हा संविधान चौकात परत आला. यावेळी पोलिसांनी वाहतुकीला अडथळा होऊ नये म्हणून मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत नेण्यास प्रतिबंध केला. त्यामुळे मोर्चातील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांची भेट घेतली. त्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले. जिल्हाधिकारी कुर्वे यांनी डॉक्टरांच्या स्थानिक समस्या सोडविण्याचे आश्वासन दिल्याचे संघटनेच्या पदाधिकाºयांनी सांगितले. मोर्चात १८०० हजारावर डॉक्टरांचा सहभाग होता, असा दावा निमा संघटनेने केला आहे. संघटनेचे डॉ. मोहन येंडे म्हणाले, जिल्ह्यातील तालुकास्थळावरही मोर्चा काढून डॉक्टरांनी मागण्यांचे निवेदन त्या-त्या तहसीलदारांना दिले.मोर्चाच्या यशस्वितेसाठी डॉ. नितीन कान्होलकर, डॉ. विकास शिरसाट, डॉ. राहुल राऊत, डॉ. भेंडे, डॉ. शैलेंद्र अग्रवाल, डॉ. राजू कोसे, डॉ. गंभीर, डॉ. पार्वती राणे, डॉ. रुपाली डांगोरे, डॉ. नाना पोजगे, डॉ. अनिल पावसेकर, डॉ. एस. एस. याकूब, डॉ. इंतेखाब आलम, डॉ. फाये, डॉ. अरुण फरकासे, डॉ. राम मासुरके आदींसह निमाचे सर्व पदाधिकारी व सदस्यांनी सहकार्य केले.
‘इंटिग्रेटेड’ शब्द वगळण्याला विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 07, 2017 1:31 AM
केंद्र शासनाकडे प्रस्तावित असलेल्या ‘नॅशनल कमिशन फॉर इंडियन सिस्टीम आॅफ मेडिसीन’ (एनसीआयएसएम) या विधेयकातून ‘इंटिग्रेटेड’ हा शब्द वगळू नये, या मुख्य मागणीला घेऊन ‘नॅशनल इंटिग्रेटेड ...
ठळक मुद्दे‘निमा’चा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा : शेकडो डॉक्टरांचा उत्स्फूर्त सहभाग