नागपूर: ‘क्लबफूट’ ही पायाची सर्वात सामान्य जन्मजात विकृती. हजार मुलांमध्ये एक, असे या विकृतीचे प्रमाण आहे. योग्य उपचारांशिवाय, पायाची विकृती कायम राहते आणि वेदना आणि चालण्याची क्षमता बिघडते, ज्याचा जीवनाच्या गुणवत्तेवर परिणाम होऊ शकतो. ‘क्लबफूट’वरील विशेष उपचारासाठी नागपूरचा अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेने (एम्स) अनुष्का फाऊंडेशनसोबत करार केला आहे. यामुळे आता दर शुक्रवारी सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत विशेष क्लिनीक रुग्णसेवेत असणार आहे.
‘क्लबफूट क्लिनीक’ करारावर ‘एम्स’चे कार्यकारी संचालक आणि सीईओ प्रा. डॉ. हनुमंथा राव यांनी मंगळवारी यावर स्वाक्षरी केली. या प्रसंगी ‘एम्स’चा अधिष्ठाता (अॅकॅ डेमिक्स) प्रा. डॉ. मृणाल फाटक, वैद्यकीय अधीक्षक प्रा. डॉ. मनीष श्रीगिरीवार, प्रा.डॉ. समीर द्विदमुठे, प्रकल्प व्यवस्थापक आशिष भदोरिया, अनुष्का फाऊंडेशनचे साईट कोऑर्डिनेटर पारस काळे व पाटील आदी उपस्थित होते. ‘एम्स’च्या ऑर्थाेपेडिक्स ओपीडीमध्ये हे क्लिनीक असणार आहे. ऑर्थाेपेडिक्सचे सहयोगी प्राध्यापक डॉ. सितांशु बारिक यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे.
ही लक्षणे ‘क्लब फुट’ची ‘क्लब फुट’चा लक्षणांमध्ये बाळाचे पाय आत किंवा बाहेरच्या बाजूस वळत नाहीत. काही बाळांमध्ये ही समस्या केवळ एकाच पायात दिसते तर अनेक बाळांमध्ये ही समस्या दोन्ही पायांत दिसू शकते. काही गंभीर प्रकरणातपंजेच उलट असतात. ज्या पायामध्ये दोष असतो त्या पायाची लांबी छोटी असते. त्या पायाचे स्नायू विकसित झालेले नसतात.
वेळीच दोष दूर कराडॉ. श्रीगिरीवार म्हणाले, ‘क्लब फुट’वर वेळीच उपचार करून दोष दूर करण्यासाठी प्रयत्न केले गेले नाही, तर मुल मोठे झाल्यावर त्याला खूप समस्यांचा सामना करावा लागू शकतो. त्याला चालताना सुद्धा समस्या निर्माण होऊ शकते. सर्जरीच्या सहाय्याने हा जन्मदोष दूर करता येऊ शकतो. यावर ‘एम्स’मधील विशेष ‘क्लिनीक’ आधार ठरण्याची शक्यता आहे.