ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 16 - काँग्रेस पक्षाला देशभरातून जनतेने नाकारल्यानंतरदेखील पक्षनेत्यांमध्ये वर्चस्वासाठी चढाओढ सुरू आहे. आपापसांत भांडण करणे हाच काँग्रेसचा मुख्य ह्यअजेंडाह्ण आहे. एखाद्या दिवाळखोरीत निघालेल्या बँकेसारखी काँग्रेस पक्षाची अवस्था झाली आहे, या शब्दांत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हल्लाबोल केला. एकात्मता नगर, जयताळा व सुभाषनगर येथे आयोजित प्रचारसभांमध्ये त्यांनी गुरुवारी वरील वक्तव्य केले.यावेळी मंचावर माजी खासदार दत्ता मेघे, बहुजन रिपब्लिकन एकता मंचच्या अध्यक्षा सुलेखा कुंभारे, आ. अनिल सोले प्रामुख्याने उपस्थित होते. काँग्रेसचे शासन असतानादेखील नेत्यांमधील भांडणाव्यतिरिक्त काहीही झाले नाही. काँग्रेसमधील मुत्तेमवार गट व चतुर्वेदी-राऊत गटाच्या भांडणात नागपूरचे प्रचंड नुकसान झाले. सत्ता नसतानादेखील हे नेते आपापसातीलच भांडणात व्यस्त आहे. लोकांच्या जमिनी हडप करणे हीच कॉंग्रेसची प्रवृत्ती आहे, अशी बोचरी टीका फडणवीस यांनी केली. मिहान प्रकल्पग्रस्तांना हक्काचे मालकीपट्टे देण्यासंदर्भात आम्ही प्रयत्नरत आहोत. जमिनीची मोजणी करायची होती. मात्र काही लोकांच्या पोटात दुखते आहे. जनतेसाठी काय काम केले, याचे ५ वर्षे पूर्ण झाल्यावर ह्यरिपोर्टकार्डह्णच सादर करू, असे ते म्हणाले....तर चेहरा दाखविणार नाही केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणीमंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली नागपुरचा वेगाने विकास होत आहे. २०१९ पर्यंत नागपूरला देशातील ह्यमॉडेलह्ण शहर बनवायचे आहे. जर असे झाले नाही तर मी चेहरादेखील दाखविणार नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्र्यांनी केले. जे बोलतो ते करतो, सेनेला चिमटायावेळी मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेवर अप्रत्यक्षरीत्या टीका केली. जगातील श्रीमंत शहरांपैकी मुंबई एक शहर आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प ३७ हजार कोटींचा आहे. मात्र असे असतानादेखील तेथील १ थेंब सांडपाण्यावर प्रक्रिया होत नाही. सगळे सांडपाणी समुद्रात जाते. नागपुरात नेमकी विरुद्ध स्थिती आहे, असे म्हणत त्यांनी ह्यबीएमसीह्णच्या कार्यप्रणालीवर बोट ठेवले. मी जे बोलतो ते करून दाखवतो आणि माझे शब्द ही काळ्या दगडावरील रेघच असते, असे सूचक वक्तव्यदेखील त्यांनी यावेळी केले.
आपापसात भांडण करणे हाच काँग्रेसचा अजेंडा
By admin | Published: February 16, 2017 10:54 PM