शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार
3
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
4
"राजकारण असा धंदा जिथे सामान्यांच्या शिव्या..."; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली भावना
5
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
7
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
8
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
9
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
10
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
11
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
12
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
13
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
14
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
15
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
16
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
17
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
18
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
19
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
20
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम

अर्णबविरोधात काँंग्रेस आक्रमक, महाराष्ट्रभरात पोलीस तक्रारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2020 1:06 AM

काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याविरोधात आपत्तीजनक वक्तव्य केल्याप्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे एडिटर इन चीफ व वृत्तनिवेदक अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात नेते व कार्यकर्त्यांनी राज्यभरात पोलीस तक्रारी दाखल कराव्या, असे निर्देश महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात व कार्याध्यक्ष तसेच ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी बुधवारी दिले.

ठळक मुद्देगुन्हेगारी षड्यंत्र, जातीयवादी भावना भडकविणे, अब्रूनुकसानीचा गुन्हा दाखलआज उच्च न्यायालयातही खटला दाखल करणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याविरोधात आपत्तीजनक वक्तव्य केल्याप्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे एडिटर इन चीफ व वृत्तनिवेदक अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात नेते व कार्यकर्त्यांनी राज्यभरात पोलीस तक्रारी दाखल कराव्या, असे निर्देश महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात व कार्याध्यक्ष तसेच ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी बुधवारी दिले. नितीन राऊत यांच्यासह दुग्ध व पशुविकास मंत्री सुनील केदार, माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे, युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष कुणाल राऊत, रामकृष्ण ओझा, बंटी शेळके व इतरांनी नागपुरातील सदर पोलीस ठाण्यात अर्णब गोस्वामी विरोधात तक्रार दाखल केली. भादंविच्या कलम ११७, १२० ब, १५३, १५३ अ, २९५ अ, २९८, ५००, ५०४, ५०५ व ५०६ तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा, २००० मधील कलम ६६ अ अंतर्गत अर्णबला त्वरित अटक करण्यात यावी, अशी यावेळी मागणी करण्यात आली.काँग्रेसचे मंत्री व नेत्यांनी झोन दोनच्या उपायुक्त विनिता साहू यांच्याकडे तक्रार सादर केली. या तक्रारीच्या आधारे अर्णब गोस्वामी विरोधात जातीयवादी भावना भडकविणे व बदनामी अब्रूनुकसानीचा गुन्हा दाखल करण्यात आला. यासोबतच काँग्रेसचे शहराध्यक्ष आ.विकास ठाकरे यांनीदेखील गोस्वामी विरोधात राणाप्रतापनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पालघर सामूहिक हत्याकांडावर अर्णब गोस्वामीने सोनिया गांधी यांच्याविरोधात केलेले वक्तव्य हे देश व राज्यातील जातीयवादी भावना भडकवून सामाजिक सौहार्द्र बिघडविण्याचा प्रयत्न होता. त्यामुळे गोस्वामी विरोधात त्वरित कारवाई व्हावी या मागणीसाठी गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जाणार असल्याची माहिती नितीन राऊत, सुनील केदार व सतीश चतुर्वेदी यांनी लोकमतशी बोलताना दिली. यानंतर नितीन राऊत, सुनील केदार, चतुर्वेदी, कुणाल राऊत, बंटी शेळके, अतुल लोंढे, रामकृष्ण ओझा यांच्या शिष्टमंडळाने गृहमंत्री अनिल देशमुख यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली व गोस्वामी विरोधात त्वरित कारवाई करण्याची मागणी केली. गृहमंत्र्यांनी पूर्ण प्रकरण सखोलपणे ऐकून घेतले व कायद्यानुसार आवश्यक ती कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले.त्यांच्या तक्रारीवर काँग्रेस नेत्यांनी सांगितले की, सोनिया गांधी यांच्यावर केलेल्या वैयक्तिक हल्ल्यामुळे गोस्वामी यांचे विशिष्ट समाजाविषयीचे वैर दिसून आले. हा विशिष्ट समाजातील लोकांना इतरांविरुद्ध भडकविण्याचा प्रयत्न होता. तक्रारकर्ते पुढे म्हणाले आहे की, गोस्वामी यांची कृती काँग्रेस पक्षाची व पक्षाच्या अध्यक्षांची बदनामी करणारी आहे. तसेच, त्यांनी विवेकबुद्धीचा उपयोग व होणाऱ्या परिणामांची चिंता न करता वक्तव्य केले आहे. गोस्वामी यांनी मंगळवारी संबंधित वृत्तवाहिनीवरील कार्यक्रमात हे वक्तव्य केले. परंतु, त्यांनी त्यावर खुलासा केला नाही किंवा माफीही मागितली नाही. अशा वक्तव्यामुळे विविध धार्मिक समूहांमध्ये कटुता, शत्रूत्व, वाईट विचार व द्वेषभावना पसरते. विविध धार्मिक समूहामधील एकोप्याच्या भावनेला नष्ट करणारी ही कृती आहे. अशा कृतीमुळे समाजातील शांतीदेखील भंग होते. पालघर घटनेमध्ये एकही आरोपी अल्पसंख्यक समाजातील नाही, असे त्यांनी सांगितले.भादंविच्या विविध कलमांतर्गत कारवाईची मागणी करताना तक्रारकर्त्यांनी नमूद केले की, गोस्वामी यांनी राज्यघटनेतील मूलतत्त्वावर आघात केला आहे आणि त्यांनी केलेल्या गुन्ह्यांचा संपूर्ण देशावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

 

टॅग्स :arnab goswamiअर्णब गोस्वामीcongressकाँग्रेस