देवडिया भवनासमोर निदर्शने : पोलिसांनी कार्यक र्त्यांना ताब्यात घेतलेनागपूर : नॅशनल हेराल्ड प्रकरणात काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी व उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरोधात केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार व भाजपने षङ्यंत्र रचल्याचा आरोप करीत शहर व जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्ते शनिवारी दुपारी रस्त्यावर उतरले. निदर्शने व रास्ता रोको करीत केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. शहर काँग्रेसने चिटणीस पार्क परिसरात रास्ता रोको केल्यामुळे वाहतूक जाम झाली होती. शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांच्यासह १०० वर कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.शहर काँग्रेस कमिटीतर्फे अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात देवडिया कॉंग्रेस भवनासमोर सुमारे तीन तास जोरदार निदर्शने केली. यानंतर कार्यक र्त्यांनी अग्रसेन चौकात रास्तारोको केला. यामुळे काही वेळ या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. हातात तिरंगी झेंडे घेऊ न कार्यक र्त्यांनी सोनियाजी, राहुलजी आगे बढो हम तुम्हारे साथ है, हुकूमशाही मानसिकतेचा निषेध असो, अशा जोरदार घोषणा दिल्या. सोनिया गांधी व राहुल गांधी यांना नॅशनल हेराल्ड प्रकरणात भाजपकडून सूडभावनेतून लक्ष्य केले जात आहे. या घटनेत काँग्रेस कार्यकर्ते सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे विकास ठाकरे यांनी सांगितले. आंदोलनात नगरसेवक प्रशांत धवड, संजय महाकाळकर, सरचिटणीस अतुल कोटेचा, उमाकांत अग्निहोत्री, अॅड. अभिजित वंजारी, राजेंद्र काळमेघ, अजय हिवरकर, राजू व्यास, डॉ. गजराज हटेवार, बंडोपंत टेंभूर्णे, कमलेश समर्थ, तानाजी वनवे,राकेश पन्नासे, गुलाबराव लाकूडकर, जयंत लुटे, रत्नाकर जयपूरकर, परमेश्वर राऊत, सुभाष खोडे, सूर्यकांत भगत, डॉ. मीनाक्षी ठाकरे, विजय बाभरे, तुफैल अशर, सेवादलाचे रामगोविंद खोबागडे, महिला काँग्रेसच्या शहर अध्यक्ष प्रज्ञा बडवाईक, दीपक कापसे, देवा उसरे, योगेश तिवारी, अरुण डवरे, वासुदेव ढोके, नितीश ग्वालबंशी, प्रसन्न जिचकार, पंकज निघोट, किशोर जिचकार, घनश्याम भांगे, दीपक वानखेडे, नयना झाडे, सुजाता कोंबाडे, हर्षला साबळे, सिंधू उईके, शीला मोहोड, रेखा बाराहाते, मालु वनवे, भावना लोणारे, उज्ज्वला बनकर, प्रेरणा कापसे आदींनी भाग घेतला. जिल्हा काँग्रेसचीही निदर्शनेनागपूर : जिल्हाध्यक्ष सुनिता गावंडे यांच्या नेतृत्वात माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांच्या उपस्थितीत जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीच्या कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. आंदोलकांनी जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीच्या समोरील रस्ता काही वेळासाठी जाम केला. या वेळी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलनात माजी आ. एस.क्यु. जमा, बाबुराव तिडके, सुरेश भोयर, बाबा आष्टनकर, मुजीब पठाण, कुंदा राऊत, शांता कुमरे, अनिल रॉय, बंटी शेळके, नरेंश बर्वे, दयाराम भोयर, हर्षवर्धन निकोसे, कृष्णा यादव, मनोज तितरमारे, नंदाताई नारनवरे, शकुर नागानी, भीमराव कडू, कुंदा आमधरे, सुनील जामगडे, उपासराव भुते, गंगाधर रेवतकर, अरुण हटवार, प्रकाश वसू, किशोर मिरे, राजकुमार तिडके आदींनी भाग घेतला. युवक काँग्रेसने काढली पदयात्रायुवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष बंटी शेळके व ग्रामीण अध्यक्ष अनिल रॉय यांच्या नेतृत्त्वात युवक काँग्रेसतर्फे पदयात्रा काढण्यात आली. पदयात्रा टिळक पुतळा, महाल येथील भाजप कार्यालयासमोर पोहचली असता भाजप विरोधात जोरदार नारेबाजी करण्यात आली. प्रवीण पोटे, सचिन किरपान, राजेश खंगारे, शुभम मोटघरे, मोतीराम मोहाडीकर, फिरोज अन्सारी संदीप यादव आदींनी आंदोलनात भाग घेतला. (प्रतिनिधी)
केंद्राच्या विरोधात काँग्रेस आक्रमक
By admin | Published: December 20, 2015 2:55 AM