नागपुरात नोटाबंदीवर काँग्रेस आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2018 09:15 PM2018-11-12T21:15:29+5:302018-11-12T21:16:12+5:30

नोटाबंदीबाबत काँग्रेसने आक्रमक धोरण अवलंबिले आहे. नोटाबंदीच्या निर्णयास दोन वर्षे झाल्यानिमित्त गेल्या ८ तारखेपासून शहरात काँग्रेसच्या विविध आघाड्यांतर्फे आंदोलने केली जात आहे. या अंतर्गत सोमवारी नागपूर शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीतर्फे संविधान चौकात तीव्र निदर्शने करण्यात आली.

Congress aggressive on demonetization in Nagpur | नागपुरात नोटाबंदीवर काँग्रेस आक्रमक

नागपुरात नोटाबंदीवर काँग्रेस आक्रमक

Next
ठळक मुद्देसंविधान चौकात निदर्शने

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नोटाबंदीबाबत काँग्रेसने आक्रमक धोरण अवलंबिले आहे. नोटाबंदीच्या निर्णयास दोन वर्षे झाल्यानिमित्त गेल्या ८ तारखेपासून शहरात काँग्रेसच्या विविध आघाड्यांतर्फे आंदोलने केली जात आहे. या अंतर्गत सोमवारी नागपूर शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीतर्फे संविधान चौकात तीव्र निदर्शने करण्यात आली.
काँग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या या आंदोलनात कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार नारेबाजी केली. यानंतर विविध वक्त्यांनी नोटाबंदीचा निर्णय कसा अपयशी ठरला. नोटाबंदीने किती जणांचा रोजगार हिरावला गेला. लोकांना आपले जीव गमवावे लागले, यावर प्रकाश टाकला.
या आंदोलनात माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, माजी सनदी अधिकारी किशोर गजभिये, अभिजित वंजारी, अ‍ॅड. नंदा पराते, शेख हुसेन, ईश्वर बरडे, संजय मांगे, जगदीश गमे, राजेश पायतोडे, प्रमोद माटे, अमन खान आदींसह मोठ्या संख्येने काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होते.

Web Title: Congress aggressive on demonetization in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.