नागपुरात राफेल घोटाळ्यावर काँग्रेस आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 11:17 PM2018-12-24T23:17:08+5:302018-12-24T23:18:14+5:30
शहर काँग्रेस कमिटीने राफेल विमान खरेदीत घोटाळा झाल्याचा आरोप करीत सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. शहराध्यक्ष विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी राफेल प्रकरणाचा तपास संयुक्त संसदीय समिती(जेपीसी)मार्फत करण्याची मागणी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहर काँग्रेस कमिटीने राफेल विमान खरेदीत घोटाळा झाल्याचा आरोप करीत सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. शहराध्यक्ष विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी राफेल प्रकरणाचा तपास संयुक्त संसदीय समिती(जेपीसी)मार्फत करण्याची मागणी केली.
कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नारेबाजी करीत निदर्शने केली. यावेळी विकास ठाकरे म्हणाले, राफेल घोटाळा हा देशाच्या इतिहासातील आजवरचा सर्वात मोठा घोटाळा आहे. पक्षाच्या
पदाधिकाऱ्यांनी यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. या निवेदनात म्हटले आहे की, राफेल विमान खरेदीमुळे देशाला ४१,२०५ कोटी रुपयाचे नुकसान झाले. राफेल घोटाळ्याबाबत झालेल्या नुकसानीची एकेक माहिती या निवेदनाद्वारे देण्यात आली.
यावेळी शिष्टमंडळात ठाकरे यांच्यासह अभिजित वंजारी, उमाकांत अग्निहोत्री, नरेश गावंडे, संजय महाकाळकर, प्रशांत धवड, संदेश सिंगलकर, रश्मी धुर्वे, स्नेहा निकोसे, युगल बिदावत, इरशाद अली, विवेक निकोसे, रमण पैगवार, संदीप सहारे, नितीन साठवणे, रमेश पुणेकर, दया जशनानी प्रामुख्याने उपस्थित होते.
मेट्रो कार्यालयासमोरही निदर्शने
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केल्यानंतर विकास ठाकरे आणि इतर पदाधिकारी पदयात्रा करीत नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या कार्यालयापर्यंत गेले. तिथेही नारेबाजी करीत निदर्शने केली. यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी मेट्रो डेपोचे इंचार्ज सक्सेना यांना निवेदन सादर केले. या निवेदनात कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन देण्याची मागणी करण्यात आली. यावेळी पंकज निघोट, नरेश शिरमवार, राजकुमार कमनानी, वीणा बेलगे, प्रवीण गवरे, आशिष नाईक, गोपाल पट्टम, मोतीराम मोहाडीकर, दिनेश तराळे, अण्णाजी राऊत, रिंकू जैन, सुनीला ढोले, स्नेहल दहीकर, सुनील दहीकर, अब्दुल शकील, इरशाद मलिक, बॉबी दहिवले, पंकज लोणारे, महेश श्रीवास, धरम पाटील, आकाश तायवाडे, देवा उसरे, वासुदेव ढोके, रहाटे, प्रसन्ना बोरकर, मामा गावंडे, प्रसन्ना जिचकार, किशोर उमाटे, निर्मला बोरकर आदी उपस्थित होते.