नागपुरात दरवाढीविरोधात काँग्रेसचा भडका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2018 10:05 PM2018-09-05T22:05:41+5:302018-09-05T22:06:22+5:30
पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या विरोधात काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. बुधवारी शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करीत दरवाढ मागे घेण्याची मागणी केली. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या विरोधात काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. बुधवारी शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करीत दरवाढ मागे घेण्याची मागणी केली. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आले.
यावेळी विकास ठाकरे यांनी जिल्हाधिकारी यांना सांगितले की, पेट्रोल ८७.२७ रुपये व डिझेल ७६.३४ रुपयांवर पोहचले आहे. दरवाढीचा परिणाम सामान्य जनतेच्या दैनंदिन जीवनशैलीवर होत आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढत आहेत. गॅस, पेट्रोल, डिझेल यांच्या किमती आटोक्यात आणल्या नाही तर काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर उतरून आंदोलन करतील, असा इशारा त्यांनी दिला. राज्य सरकारने पेट्रोल व डिझेलवरील अन्यायी कर व अधिभार रद्द करून पेट्रोल-डिझेलला जीएसटीच्या कक्षेत आणण्याची मागणी त्यांनी केली.
आंदोलनात विशाल मुत्तेमवार,अॅड. अभिजित वंजारी, नगरसेवक संजय महाकाळकर, प्रदेश सचिव अतुल कोटेचा, माजी नगरसेवक प्रशांत धवड, दीपक वानखेडे, डॉ. गजराज हटेवार, प्रा. दिनेश बानाबाकोडे, बंडोपंत टेंभुर्णे, रमण पैगवार, अल्पसंख्यक सेल अनु.जाती-जमाती अध्यक्ष विवेक निकोसे, व्यापारी आघाडी सेल अध्यक्ष श्रीकांत ढोलके, अॅड. अक्षय समर्थ, फिरोज खान, माजी आमदार यशवंत बाजीराव, नगरसेवक रमेश पुणेकर, सरस्वती सलामे, रेखा बाराहाते, नेहा निकोसे, उज्ज्वला बनकर, ओबीसी सेलचे अध्यक्ष चंद्रकात हिंगे, इरशाद अली, रमण ठवकर, प्रा. अनिल शर्मा, प्रशांत कापसे, नरेश शिरमवार, प्रसन्ना जिचकार, अरविंद वानखेडे, चेतन ठाकरे, मामा गावडे, जयंत दियेवार, कुमार बोरकुटे, रवी गाडगे, वीणा बेलगे, पाटील, राजेश कुंभलकर, किशोर गीद, अशरफ खान, मिलिंद सोनटक्के, जगदीश गमे, एस.एम.शर्मा, बॉबी दहीवाले, धरम पाटील, पंकज थोरात, वैभव काळे, पंकज निघोट, इरशाद मलिक, युगल विदावत, प्रवीण गवरे, संजय कडू, संजय करणकर, अनिता ठेंगरे, कमलेश लारोकर, जॉन थॉमस यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले.