शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

नागपुरात काँग्रेसचे मोदी सरकारविरोधात आंदोलन; पंतप्रधानांच्या 'त्या' वक्तव्याचा केला निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2022 1:25 PM

मुंबई व महाराष्ट्रानेच देशभर कोरोना पसरविला, या आरोपामुळे काँग्रेस संतापली आहे. नागपुरातील संविधान चौकात काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने करून मोदी सरकारचा निषेध नोंदवला.

ठळक मुद्देनागपुरातील संविधान चौकात निदर्शने

नागपूर : पंतप्रधान मोदी यांनी सोमवारी लोकसभेत काँग्रेसविरोधात जोरदार टीका केली होती. मुंबई व महाराष्ट्रानेच देशभर कोरोना पसरविला, असे वक्तव्य त्यांनी केले होते. या आरोपामुळे काँग्रेस संतापली आहे. आज नागपुरात काँग्रेसच्या वतीने मोदींच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. 

पंतप्रधान मोदी यांनी सोमवारी संसदेत करोना प्रसाराबाबत काँग्रेस व महाविकास आघाडी सरकारबाबत केलेल्या वक्तव्याचे पडसाद राज्यात उमटले आहेत. नागपुरातील संविधान चौकात काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन' करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने करून मोदी सरकारचा निषेध नोंदवला.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी महाराष्ट्र व दिल्लीच्या सरकारांवर टीकेची झोड उठवली. कोरोना विषाणू संक्रमणाच्या रुपाने जग गेल्या शंभर वर्षांतील भयंकर महामारी अनुभवत असताना विरोधकांनी सरकारला अडचणीत आणण्याचे प्रयत्न सोडले नाहीत, जगभर भारताची बदनामी करण्याची मोहीम राबविण्यात आली, असा गंभीर आरोप केला.

महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडीचा घटकपक्ष काँग्रेस हे त्यांचे खास लक्ष्य होते. २०२० च्या मार्च-एप्रिल-मे महिन्यात लॉकडाऊनवेळी ‘असाल तिथेच थांबण्या’च्या सूचना असताना काँग्रेस नेत्यांनी मुंबईत परप्रांतीय मजुरांना मोफत रेल्वे तिकिटे पुरवली व त्यांना त्यांच्या राज्यात पाठविले. दिल्लीतही परप्रांतीयांना शहराबाहेर काढून देण्यात आले. त्यामुळे उत्तर प्रदेश, बिहार, उत्तराखंड, पंजाबसह देशभर कोरोना पसरविण्याचे पाप काँग्रेसने केले, अशी टीका पंतप्रधानांनी केली होती. यानंतर, महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संपूर्ण राज्यभरात आजपासून ‘मोदी माफी मागो’ या मागणीसाठी आंदोलन करण्यात येईल, असे सांगितले होते. त्यानुसार नागपूरमध्ये हे आंदोलन करण्यात आले.

टॅग्स :agitationआंदोलनBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसPoliticsराजकारण