नागपूर : काँग्रेसचे पदाधिकारी व नेत्यांनी ‘महंगाई पे चर्चा’ आंदोलनास सुरुवात केली. बाजारपेठेत जावून व्यापारी व ग्राहकांना भेटून 'महंगाई' कम हुई की नही ? अशी थेट विचारणा केली. एवढेच नव्हे तर २०१४ च्या पूर्वी पेट्रोल, डिझेल व विविध वस्तुंचे भाव काय होते व आजचे दर काय आहेत, याचा चार्ट दाखवत नागरिकांनीच आता जागरुक होण्याचे आवाहन केले.
काँग्रेसतर्फे नागपूर शहरातील सहाही विधानसभा मतदारसंघात हे आंदोलन करण्यात आले. दक्षिण नागपुरातील उमरेड रोड, टेलिफोन चौक, दिघोरी चौकात झालेल्या आंदोलनाचे नेतृत्व गिरीश पांडव यांनी केले. आंदोलनात ब्लॉक अध्यक्ष प्रवीण गवरे, दिनेश तराळे, विश्वेश्वर अहीरकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले. महागाई कशी वाढत गेली याचे पत्रक छापून ते व्यापारी तसेत ग्राहकांना वाचून दाखविण्यात आले. एवढेच नव्हे तर वाढलेल्या महागाईबाबत व्यापारी व ग्राहकांचे मतही जाणून घेण्यात आले. या चर्चेदरम्यान व्यापारी,सामान्य जनता, बेरोजगार युवक, गृहिणींनी केंद्र सरकारच्या विरोधात नाराजी व्यक्त केली. महागाई वाढविणाऱ्या सरकारला येत्या निवडणूकीत हद्दपार करा, असे आवाहन काँग्रेस कार्यकर्त्यांकडून करण्यात आले.
विधानसभानिहाय ब्लाॅक अध्यक्ष पंकज थोरात,पंकज निघोट,रजत देशमुख,दिनेश तराळे,प्रविण गवरे,विश्वेश्वर अहिरकर,अब्दुल शकील,मोतीराम मोहाडीकर,ईरशाद मलिक,सुरज आवळे, ज्ञानेश्वर ठाकरे यांनी आंदोलनाची धुरा सांभाळली. आंदोलनात संजय महाकाळकर, महासचिव डाॅ.गजराज हटेवार, डाॅ. प्रकाश ढगे, महेश श्रीवास, आकाश तायवाडे, जाॅन थाॅमस, अनिता ठेंगरे, लीना कटारे, नंदा देशमुख, हेमत चैधरी, प्रशांत ढाकणे, शुभम आमधरे, नितीन बैसवारे, मिलिंद संभे, अभय सोमकुळे, आदेश मोहोड, अण्णाजी राउत, प्रकाश लायसे, मंगेश पाठरांबे आदी सहभागी झाले.