लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : क्रांतिदिवसाला इंग्रजांविरोधात ‘चले जाव’चा नारा देण्यात आला होता. आज देशात तशीच स्थिती असून निवडणुकांची जबाबदारी असलेले निवडणूक आयोग कुणाच्या तरी हातातील कठपुतली असल्याप्रमाणे भूमिका घेत आहे. ९ ऑगस्ट रोजी मुंबईतून देशाला ‘ईव्हीएम’मुक्त करण्यासाठी सर्व विरोधी पक्ष एकत्र येत आहेत. यासाठी पुढाकार घेणारे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत काँग्रेस पक्ष उभा आहे, असे प्रतिपादन विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले.नागपुरात पत्रपरिषदेदरम्यान ते बोलत होते. ‘ईव्हीएम’संदर्भात निवडणूक आयोगात दुमत आहे. देशात अशी स्थिती कधीही उद्भवली नव्हती. निवडणूक आयोगाने आम्हाला बोलवावे, आम्ही ‘ईव्हीएम’चा फोलपणा सिद्ध करून दाखवू. राज ठाकरे यांनी सरकारविरोधात भूमिका घेतली आहे. त्यामुळे आता त्यांच्याविरोधात ‘ईडी’ची चौकशी लावून त्यांचा आवाज दाबण्याचा सरकारने प्रयत्न करू नये, असे मत वडेट्टीवार यांनी व्यक्त केले. राज्य शासनाच्या भूमिकेमुळे राज्यातील सहकार क्षेत्राचे वाटोळे झाले. सर्वच क्षेत्रात बेरोजगारी वाढली. अशा स्थितीत आपले अपयश लपविण्यासाठी महाजनादेश यात्रा काढण्यात येत आहे. याऐवजी सरकारने कामे केली असती तर अशी वेळच आली नसती, असा टोला त्यांनी लगावला. राष्ट्रवादीच्या नेत्यांना ‘अलीबाबा और चालीस चोर’ असे भाजपची नेतेमंडळी म्हणायची. आज त्यांच्या नेत्यांना सापळा रचून त्यांची शिकार करणे सुरू आहे. आता भाजपात आल्यानंतर त्यांच्यादृष्टीने ‘चोर’ असलेले लोक पवित्र झाले का, असा प्रश्नदेखील वडेट्टीवार यांनी केला.मिलिंद नार्वेकरांनी दिली सेनेत येण्याची ‘ऑफर’शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी मला २५ वेळा फोन केले. यातील २३ वेळा मी फोन उचलला नाही. त्यांनी मला शिवसेनेत येण्याची ‘ऑफर’ दिली. तुमच्या येण्यामुळे आम्ही परत सत्तेत येऊ. तुम्हाला कॅबिनेट मंत्रिपद देण्यात येईल, असे प्रलोभनदेखील दिले. मात्र माझी भूमिका स्पष्ट आहे व मी कधीही काँग्रेसशी गद्दारी करणार नाही, असे वडेट्टीवार यांनी सांगितले. ‘वर्षा’तून एकही फोन आला नसल्याचेदेखील त्यांनी स्पष्ट केले.
‘ईव्हीएम’मुक्तीसाठी काँग्रेस राज ठाकरेंसोबत : विजय वडेट्टीवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2019 9:32 PM
क्रांतिदिवसाला इंग्रजांविरोधात ‘चले जाव’चा नारा देण्यात आला होता. आज देशात तशीच स्थिती असून निवडणुकांची जबाबदारी असलेले निवडणूक आयोग कुणाच्या तरी हातातील कठपुतली असल्याप्रमाणे भूमिका घेत आहे. ९ ऑगस्ट रोजी मुंबईतून देशाला ‘ईव्हीएम’मुक्त करण्यासाठी सर्व विरोधी पक्ष एकत्र येत आहेत. यासाठी पुढाकार घेणारे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत काँग्रेस पक्ष उभा आहे, असे प्रतिपादन विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले.
ठळक मुद्दे सरकारकडून सापळा रचून विरोधी गटांतील नेत्यांची शिकार