नागपुरात काँग्रेसच्या जनता दरबारात महापालिकेवर रोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2020 12:29 AM2020-02-16T00:29:10+5:302020-02-16T00:30:28+5:30
शहरात आपला जनसंपर्क वाढवण्याच्या उद्देशाने काँग्रेसने दर शनिवारी जनता दरबार आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. याप्रकारच्या पहिल्या जनता दरबारात मनपाशी संबंधित मुद्दे विशेषत्वाने दिसून आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरात आपला जनसंपर्क वाढवण्याच्या उद्देशाने काँग्रेसने दर शनिवारी जनता दरबार आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. याप्रकारच्या पहिल्या जनता दरबारात मनपाशी संबंधित मुद्दे विशेषत्वाने दिसून आले. महापालिकेतील कामांवर नागरिकांचा विशेष रोष होता. पक्षाचे शहराध्यक्ष आ. विकास ठाकरे यांनी सर्व नागिरकांच्या समस्या ऐकून घेत त्या समस्या सोडविण्यासाठी ठोस पाऊल उचलण्याचे आश्वासन दिले.
देवडिया काँग्रेस भवन येथे आयोजित जनता दरबारात नागरिकांनी आपल्या समस्या विशद केल्या. पंतप्रधान घरकूल योजनेचा लाभ मिळत नसल्याची तक्रार केली. अतिक्रमण विरोधी कारवाई, वीज व पाणीपुरवठ्याबाबतही लोकांच्या तक्रारी होत्या. सिमेंट रस्त्यांची कामे व रस्त्यांच्या दयनीय अवस्थेबाबत नागरिकांमध्ये असंतोष दिसून आला. आ. ठाकरे यांनी यावेळी अधिकाऱ्यांना फोन करून समस्या तातडीने सोडवण्याचे निर्देश दिले. यावेळी व्यवस्थापन कार्यसमितीचे पदाधिकारी गजराज हटेवार, प्रा. दिनेश बानाबाकोडे, संदेश सिंगलकर, वीणा बेलगे, प्रा. हरीश खंडाईत, दयाल जसनानी, जॉन थॉमस, प्रा. अनिल शर्मा, महेश श्रीवास, राजेश कुंभलकर, रवी गाडगे पाटील, सुनील दहीकर, स्नेहल दहीकर यांच्यासह डॉ. मनोहर तांबुलकर, चंद्रकांत हिंगे, अशोक निखाडे, गोपाल पट्टम, सुनिता ढोले, प्रशांत आस्कर, अॅड. अक्षय समर्थ, विश्वेश्वर अहिरकर, देवेंद्र रोटेले, अंजुम कयूम, निर्मला बोरकर, बाळू सातपुते, गोपाल बॅनर्जी, प्रशांत पाटील, हफीज पठाण, बालू शेख, पिंटू तिवारी, विनोद शिंगणे आदी उपस्थित होते.