काँग्रेसचा नागपूर मनपावर हल्लाबोल !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 10:34 PM2018-05-17T22:34:51+5:302018-05-17T22:52:47+5:30
शहरातील नागरिक पाणीटंचाई, अर्धवट सिमेंट रोड व कचऱ्यामुळे त्रस्त आहेत. नागरिकांच्या ज्वलंत समस्याकडे महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शहर काँग्रेस कमिटीतर्फे शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात गुरुवारी महापालिका मुख्यालयावर हल्लाबोल आंदोलन करून आयुक्तांना घेराव करण्यात आला. शहर काँग्रेस कमिटीच्या आंदोलनानंतर विरोधीपक्षनेते तानाजी वनवे यांच्या नेतृत्वात युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पाणीटंचाई विरोधात वेगळे आंदोलन केले. कार्यक र्त्यांनी महापौरांच्या कक्षात माठ फोडून घोषणाबाजी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उपराजधानीला स्मार्ट सिटी करण्याच्या सत्तापक्षाकडून मोठमोठ्या घोषणा सुरू आहे. परंतु शहरातील नागरिक पाणीटंचाई, अर्धवट सिमेंट रोड व कचऱ्यामुळे त्रस्त आहेत. नागरिकांच्या ज्वलंत समस्याकडे महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शहर काँग्रेस कमिटीतर्फे शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात गुरुवारी महापालिका मुख्यालयावर हल्लाबोल आंदोलन करून आयुक्तांना घेराव करण्यात आला. शहर काँग्रेस कमिटीच्या आंदोलनानंतर विरोधीपक्षनेते तानाजी वनवे यांच्या नेतृत्वात युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पाणीटंचाई विरोधात वेगळे आंदोलन केले. कार्यक र्त्यांनी महापौरांच्या कक्षात माठ फोडून घोषणाबाजी केली.
शहरातील नागरिक पाणीटंचाईमुळे त्रस्त असताना नागरिकांकाडून पाण्याचे बिल वसूल केले जात आहे. २४ बाय ७ योजना असूनही काही भागामध्ये ८-८ दिवस पाणी मिळत नाही. सिमेंट रस्त्याचे काम अनेक ठिकाणी अपूर्ण आहे. यामुळे अपघात वाढले आहे. नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. दवाखाने महापालिका चांगल्या पद्धतीने चालवू शकत नाही. यात सुधारणा न करता दवाखान्याचे खासगीकरण करण्याचा सपाटा मनपातील सत्तापक्षाने चालविला आहे. कनक रिसोर्सेस कंपनी शहरातील कचरा उचलण्याऐवजी साठविण्याचे काम करीत आहे. असे असूनही कनकच्या कंत्राटदारास २५ कोटी देण्यात आल्याचा आरोप विकास ठाकरे यांनी आयुक्त वीरेंद्र सिंग यांना दिलेल्या निवेदनातून केला. यावेळी अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे उपस्थित होते.
महापालिकेने सायबरटेक कंपनीला शहरातील घराचे सर्वेक्षण करून संपत्तीकर आकारण्याची जबाबदारी सोपविली. परंतु कंपनीने चुकीचे सर्वेक्षण केले. अनाठायी कर आकारणी करण्यात आली. असे असूनही या कंपनीवर कारवाई न करता महापालिकेने ५.५ कोटी दिले. तसेच सायबरटेकने केलेला सर्वे तपासण्यासाठी आता पुन्हा २ कोटी खर्च केले जात आहे. अशा प्रकारचे महापालिकेत जनतेच्या पैशाची लूट सुरू आहे. महापौर व पदाधिकाºयांचे याकडे दुर्लक्ष आहे. वंश निमय कंपनीने राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान केलेले आहे. मेसर्स जे.एन.एन.यु.आर.एम. योजनेंतर्गत मिळालेल्या २६० बसेस भंगारात टाकलेल्या आहेत.
मध्य नागपुरातील महात्मा गांधी यांच्या नावाने असलेला गांधीबाग उद्यानाच्या जागेपैकी ६८,३६०चौ. फूट जागेवर नऊ मजली इमारत बांधण्याचा कट तेथील नगरसेवकाने चालू केलेला आहे. आदी मागण्यांचे निवेदन विकास ठाकरे यांनी अयुक्तांना दिले.
आंदोलनात उमाकांत अग्निहोत्री, विशाल मुत्तेमवार, संजय महाकाळकर, अॅड. अभिजित वंजारी, प्रशांत धवड, दीपक वानखेडे, डॉ. गजराज हटेवार, प्रा. दिनेश बानाबाकोडे, जयंत लुटे, नगरसेवक संदीप सहारे, रमेश पुणेकर, मनोज सांगोळे, नितीश ग्वालबंशी, दिनेश यादव, परसराम मानवटकर, देवा उसरे, रमण पैगवार, वासुदेव ढोके, अण्णाजी राऊत, नगरसेविका दर्र्शनी धवड, स्नेहा विवेक निकोसे, भावना लोणारे, रश्मी धुर्वे, नेहा राके श निकोसे, उज्ज्वला बनकर, हर्षला साबळे, सरस्वती सलामे, अॅड. रेखा बाराहाते, भोला कुचनकर, अॅड. अक्षय समर्थ, अॅड. रवी नायडू, प्रवीण सांदेकर, विनोद नागदेवते, राजभाऊ चिलाटे, सुनील दहीकर, राजेश जमदाळे, भारती कामडी, प्रशांत ढाकणे, मिलिंद सोनटक्के, विलास वाघ, अब्दुल शकीलभाई, रत्नाकर जयपूरकर, अरविंद वानखेडे, डॉं. रामदास सांतगे, ढोंगे काकाजी, जयंता दियेवार, सेवादल अध्यक्ष रामगोविंद खोब्रागडे, चंद्रकांत हिंगे, नंदा देशमुख, प्रवीण गवरे, मनीष चांदेकर, किशोर उमाठे, प्रसन्ना जिचकार, पापा ठाकूर, जितेंद्र हावरे, डॉ. मनोहर तांबुलकर, इलमकर गुरुजी, योगेश देवतळे, कुमार बोरकुटे, कमलेश लारोेकर, युवराज शिव, इरशाद अली, सुरज आवळे, पंकज निघोट, पंकज थोरात, अमित पाठक, वैभव काळे, मंगेश कामोने, पुरुषोत्तम पारमोरे, विशालल वाघमारे, आकाश तायवाडे, विनायक इंगोले, राबर्ट्र वंजारी, राम कळंबे, चंदाभाऊ राऊत, वसीम खान, शाहीद खान, शंकर उमरेडकर, विजय चिटमिटवार, राजेंद्र नंदनकर, ईश्वर बरडे, निर्मला बोरकर, रोशन बुधवारे, प्रकाश बांते, अंबादास गोंडाणे, सचिन कलनाके, सुशील माटे, चंदू वाकोडीकर, दिनेश तराळे, प्रमोद ठाकूर. मिलिंद दुपारे, राजकुमार कमनानी, युगलकुमार विदावत, निखिल धांडे, बंटी तुरणकर, वसंता बनकरसह मोठ्या संख्येनी पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.