लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वाशिम येथील गायरान जमीन वाटपाशी तत्कालीन महसूल मंत्र्यांचा नव्हे तर महसूल राज्यमंत्र्यांचाच संबंध असून त्यासंदर्भातील सर्व अधिकार महसूल राज्यमंत्री म्हणून अब्दुल सत्तार यांना होते, असा दावा काँग्रेस विधिमंडळ पक्षाने केला आहे. त्यामुळे घोटाळ्याला तत्कालीन महसूल राज्यमंत्री सत्तारच जबाबदार असल्याचे काँग्रेसने विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या वतीने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. वाशिम गायरान जमीन वाटप घोटाळ्याला तत्कालीन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात जबाबदार असल्याची टीका राधाकृष्ण विखे-पाटील यांनी मंगळवारी केली. त्यावर काँग्रेसने निवेदनाद्वारे खुलासा केला आहे. सत्तार यांना वाचविण्यासाठी विखे-पाटील खोटी माहिती देत असल्याचा आरोप काँग्रेसने निवेदनातून केला आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"