नागपुरात महागाई विरोधात काँग्रेसचा बैलगाडी मोर्चा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 11:46 PM2018-05-24T23:46:22+5:302018-05-24T23:46:36+5:30

गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल डिझेलचे दर सतत वाढत आहे. यामुळे महागाईत भर पडली आहे. या दरवाढी विरोधात शहर काँग्रेस गुरुवारी रस्त्यावर उतरली. जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढत धडक दिली. यावेळी महागाई वाढविण्यासाठी भाजपाप्रणित केंद्र व राज्य सरकारला जबाबदार ठरवत विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दरवाढ करून पैसे उकळणे ही सामान्य जनतेची लूट नाही का, असा सवालही सरकारला करण्यात आला.

Congress bullock cart rally against inflation in Nagpur | नागपुरात महागाई विरोधात काँग्रेसचा बैलगाडी मोर्चा 

नागपुरात महागाई विरोधात काँग्रेसचा बैलगाडी मोर्चा 

googlenewsNext
ठळक मुद्देपेट्रोल डिझेल दरवाढीचा निषेध : जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

लोकमत न्यूज नेटवर्क  
नागपूर : गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल डिझेलचे दर सतत वाढत आहे. यामुळे महागाईत भर पडली आहे. या दरवाढी विरोधात शहर काँग्रेस गुरुवारी रस्त्यावर उतरली. जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढत धडक दिली. यावेळी महागाई वाढविण्यासाठी भाजपाप्रणित केंद्र व राज्य सरकारला जबाबदार ठरवत विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दरवाढ करून पैसे उकळणे ही सामान्य जनतेची लूट नाही का, असा सवालही सरकारला करण्यात आला.
शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले. पेट्रोल व डिझेलच्या दरवाढीमुळे आता नागरिकांना वाहने चालविणे परवडेनासे झाले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा बैलगाडी चालविण्याचे दिवस सरकार आणू पाहत आहे, असा आरोप करीत संविधान चौकातून बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. मोर्चात कार्यकर्ते ‘अब की बार, महंगाई की मार’, ‘कहा गये भाई कहा गये, अच्छे दिन कहा गये’ असे नारे देत सरकारचा निषेध नोंदवित होते. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर पोहचला असता पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरात नारेबाजी केली. यानंतर विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने उपजिल्हाधिकारी यांना निवेदन दिले.
आंदोलनात चिटणीस उमाकांत अग्निहोत्री, माजी विरोधी पक्षनेता संजय महाकाळकर,अ‍ॅड.अभिजित वंजारी, प्रशांत धवड,बंडोपंत टेंभुर्णे,डॉ.गजराज हटेवार,प्रा.दिनेश बानाबाकोडे,जयंत लुटे, रत्नाकर जयपूरकर,रमण पैगवार, मालिनी खोब्रागडे, विना बेलगे,उमेश शाहू, फिरोज खान,संजय सरायकर, रवि गाडगे पाटील, अशोक निखाडे, प्रवीण गवरे,सुनील दहीकर, दयाल जसनानी,धरम पाटील, प्रशांत धाकने,राजेश कुंभलकर, प्रवीण सांदेकर,किशोर गीद,ईरशाद अली,सुरज आवळे,प्रमोद सिंग ठाकूर,नगरसेवक दर्शनी धवड, हरीश ग्वालवंशी, रेखा बाराहाते, सरस्वती सलामे, उज्ज्वला बनकर, पंकज निघोट, ईरशाद मलिक, अनिल पांडे, निर्मला बोरकर, दिनेश तराळे, पंकज थोरात, वैभव काळे, पंकज निघोट,अमित पाठक, प्रकाश बांते, अंबादास गोंडाणे,बॉबी दहीवाले, प्रसन्ना जिचकार,संजय मांगे, जगदीश गमे, ईश्वर बरडे, विलास भालेराव, गीता काळे, सुनिता ढोले,हलीम अन्सारी,मोहम्मद रिजवान,आकाश तायवाडे,अब्दुल नियाज नाजु, देवेद्र रोटेले, युवराज शीव,विजय मांजरेकर,प्रशांत आस्कर, रॉबर्ट वंजारी,विशाल वाघमारे, पुरुषोत्तम पारमोरे,कुमार बोरकुटे,सदन यादव, अजय नासरे,रोशन बावरे,मिलिंद संबे,विजय माने,अजय सोनकुळे,स्वप्निल गांठीबांधे,आतीक झिगरे,किशोर श्रीराव, भारती कामडी,रवि ढेगे, राजेश ढेगे,मिलिंद सोनटक्के,युगल विदावत,मिलिंद येवले,प्रशांत पाटील, अ‍ॅड.रणदिवे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले.

पेट्रोल-डिझेलवरील अन्यायी
कर रद्द करा : विकास ठाकरे
- पेट्रोल व डिझेलचे दर हे आजपर्यतच्या इतिहासात सर्वात वाढले आहेत. महागाई कमी करण्याचे आश्वासन देऊन सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने पेट्रोल व डिझेलवर अन्याय कर लादल्यामुळे देशात इंधनाच्या किमती उच्चांकी पातळीवर पोहोचल्या आहेत. देशात सर्वात महाग पेट्रोल नागपूरात आहे. केंद्र सरकार पेट्रोलवर १९.४८ रुपये तर डिझेलवर १५.३३ रुपये उत्पादन कर तसेच महाराष्ट्र सरकार ४६.५२ टक्के वॅट आकारत असल्यामुळे दरवाढ जास्त प्रमाणात होऊन जनतेची लूट होत आहे. केंद्र व राज्य सरकारने पेट्रोल व डिझेलवरील अन्यायी कर व अधिभार रद्द करून पेट्रोल डिझेलला जीएसटीच्या कक्षेत आणावे आणि सर्वसामान्यांना महागाईपासून दिलासा दयावा व जनतेची लूट थांबवावी, अशी मागणी यावेळी विकास ठाकरे यांनी केली.

Web Title: Congress bullock cart rally against inflation in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.