शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
2
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
3
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
4
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
5
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
6
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
7
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
8
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
9
Priyanka Gandhi : "महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
10
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
11
अबब! मतदानाच्या ४ दिवस आधी मुंबईत मोठी कारवाई; ८४७६ किलो चांदी पाहून अधिकारी हैराण
12
Sankashti Chaturthi 2024: संकष्टीने सुरु होणारा आठवडा बाराही राशींसाठी ठरणार लाभदायी!
13
'या' १८ जिल्ह्यांमध्ये आता हॉलमार्किंगशिवाय सोन्याचे दागिने विकले जाणार नाहीत
14
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज
15
पुढील वर्षी १० वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची तयारी, मार्ग आणि फीचर्स जाणून घ्या...
16
IPO च्या समुद्रात उतरणार अमन गुप्ता यांची 'boAt', काय आहे कंपनीचा प्लान?
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:'व्होट जिहादची भाषा होणार असेल तर महायुतीने बांगड्या भरलेल्या नाहीत'; आशिष शेलारांचा इशारा
18
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
19
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
20
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर

नागपुरात महागाई विरोधात काँग्रेसचा बैलगाडी मोर्चा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 11:46 PM

गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल डिझेलचे दर सतत वाढत आहे. यामुळे महागाईत भर पडली आहे. या दरवाढी विरोधात शहर काँग्रेस गुरुवारी रस्त्यावर उतरली. जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढत धडक दिली. यावेळी महागाई वाढविण्यासाठी भाजपाप्रणित केंद्र व राज्य सरकारला जबाबदार ठरवत विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दरवाढ करून पैसे उकळणे ही सामान्य जनतेची लूट नाही का, असा सवालही सरकारला करण्यात आला.

ठळक मुद्देपेट्रोल डिझेल दरवाढीचा निषेध : जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

लोकमत न्यूज नेटवर्क  नागपूर : गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल डिझेलचे दर सतत वाढत आहे. यामुळे महागाईत भर पडली आहे. या दरवाढी विरोधात शहर काँग्रेस गुरुवारी रस्त्यावर उतरली. जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढत धडक दिली. यावेळी महागाई वाढविण्यासाठी भाजपाप्रणित केंद्र व राज्य सरकारला जबाबदार ठरवत विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दरवाढ करून पैसे उकळणे ही सामान्य जनतेची लूट नाही का, असा सवालही सरकारला करण्यात आला.शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले. पेट्रोल व डिझेलच्या दरवाढीमुळे आता नागरिकांना वाहने चालविणे परवडेनासे झाले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा बैलगाडी चालविण्याचे दिवस सरकार आणू पाहत आहे, असा आरोप करीत संविधान चौकातून बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. मोर्चात कार्यकर्ते ‘अब की बार, महंगाई की मार’, ‘कहा गये भाई कहा गये, अच्छे दिन कहा गये’ असे नारे देत सरकारचा निषेध नोंदवित होते. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर पोहचला असता पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरात नारेबाजी केली. यानंतर विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने उपजिल्हाधिकारी यांना निवेदन दिले.आंदोलनात चिटणीस उमाकांत अग्निहोत्री, माजी विरोधी पक्षनेता संजय महाकाळकर,अ‍ॅड.अभिजित वंजारी, प्रशांत धवड,बंडोपंत टेंभुर्णे,डॉ.गजराज हटेवार,प्रा.दिनेश बानाबाकोडे,जयंत लुटे, रत्नाकर जयपूरकर,रमण पैगवार, मालिनी खोब्रागडे, विना बेलगे,उमेश शाहू, फिरोज खान,संजय सरायकर, रवि गाडगे पाटील, अशोक निखाडे, प्रवीण गवरे,सुनील दहीकर, दयाल जसनानी,धरम पाटील, प्रशांत धाकने,राजेश कुंभलकर, प्रवीण सांदेकर,किशोर गीद,ईरशाद अली,सुरज आवळे,प्रमोद सिंग ठाकूर,नगरसेवक दर्शनी धवड, हरीश ग्वालवंशी, रेखा बाराहाते, सरस्वती सलामे, उज्ज्वला बनकर, पंकज निघोट, ईरशाद मलिक, अनिल पांडे, निर्मला बोरकर, दिनेश तराळे, पंकज थोरात, वैभव काळे, पंकज निघोट,अमित पाठक, प्रकाश बांते, अंबादास गोंडाणे,बॉबी दहीवाले, प्रसन्ना जिचकार,संजय मांगे, जगदीश गमे, ईश्वर बरडे, विलास भालेराव, गीता काळे, सुनिता ढोले,हलीम अन्सारी,मोहम्मद रिजवान,आकाश तायवाडे,अब्दुल नियाज नाजु, देवेद्र रोटेले, युवराज शीव,विजय मांजरेकर,प्रशांत आस्कर, रॉबर्ट वंजारी,विशाल वाघमारे, पुरुषोत्तम पारमोरे,कुमार बोरकुटे,सदन यादव, अजय नासरे,रोशन बावरे,मिलिंद संबे,विजय माने,अजय सोनकुळे,स्वप्निल गांठीबांधे,आतीक झिगरे,किशोर श्रीराव, भारती कामडी,रवि ढेगे, राजेश ढेगे,मिलिंद सोनटक्के,युगल विदावत,मिलिंद येवले,प्रशांत पाटील, अ‍ॅड.रणदिवे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले.पेट्रोल-डिझेलवरील अन्यायीकर रद्द करा : विकास ठाकरे- पेट्रोल व डिझेलचे दर हे आजपर्यतच्या इतिहासात सर्वात वाढले आहेत. महागाई कमी करण्याचे आश्वासन देऊन सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने पेट्रोल व डिझेलवर अन्याय कर लादल्यामुळे देशात इंधनाच्या किमती उच्चांकी पातळीवर पोहोचल्या आहेत. देशात सर्वात महाग पेट्रोल नागपूरात आहे. केंद्र सरकार पेट्रोलवर १९.४८ रुपये तर डिझेलवर १५.३३ रुपये उत्पादन कर तसेच महाराष्ट्र सरकार ४६.५२ टक्के वॅट आकारत असल्यामुळे दरवाढ जास्त प्रमाणात होऊन जनतेची लूट होत आहे. केंद्र व राज्य सरकारने पेट्रोल व डिझेलवरील अन्यायी कर व अधिभार रद्द करून पेट्रोल डिझेलला जीएसटीच्या कक्षेत आणावे आणि सर्वसामान्यांना महागाईपासून दिलासा दयावा व जनतेची लूट थांबवावी, अशी मागणी यावेळी विकास ठाकरे यांनी केली.

टॅग्स :congressकाँग्रेसagitationआंदोलन