काँग्रेस उमेदवारांनी रॅली काढून अर्ज भरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2019 09:42 PM2019-03-25T21:42:34+5:302019-03-25T21:44:53+5:30
नागपूर लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले व रामटेक मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार किशोर गजभिये यांनी उमेदवारी दाखल करण्यासाठी सोमवारी सदर भागातील बिशॉप कॉटन स्कूल ग्राऊंड येथून रॅली काढून संविधान चौक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन केले. त्यानंतर रॅलीने ढोलताशांच्या गजरात जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले व रामटेक मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार किशोर गजभिये यांनी उमेदवारी दाखल करण्यासाठी सोमवारी सदर भागातील बिशॉप कॉटन स्कूल ग्राऊंड येथून रॅली काढून संविधान चौक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन केले. त्यानंतर रॅलीने ढोलताशांच्या गजरात जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केले.
यावेळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अविनाश पांडे, माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, माजी मंत्री नितीन राऊत, माजी मंत्री अनिल देशमुख, माजी खासदार गेव्ह आवारी, शहर काँग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे, ग्रामीण काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र मुळक, आमदार प्रकाश गजभिये, माजी आमदार अशोक धवड, दीनानाथ पडोळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष अनिल अहिरकर, जि.प.चे माजी अध्यक्ष सुरेश भोयर, यादवराव देवगडे, अॅड. अभिजित वंजारी, विशाल मुत्तेमवार, शेख हुसैन,महापालिकेतील विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, नगरसेवक प्रफुल्ल गुडधे, दुनेश्वर पेठे, माजी महापौर किशोर डोरले, अतुल लोंढे, प्रशांत पवार, नगरसेवक मनोज सांगोळे, नितीन साठवणे, प्रशांत धवड, बंटी शेळके, मनोज साबळे, हरीश ग्वालबन्शी, पुरुषोत्तम हजारे, महिला काँग्रेसच्या शहर अध्यक्ष प्रज्ञा बडवाईक, प्रवीण कुंटे पाटील, ईश्वर बाळबुदे, दिलीप पनकु ले, रमेश फुले, बजरंगसिंग परिहार, वेदप्रकाश आर्य, राजू नागुलवार यांच्यासह काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते. काँग्रेस कार्यकर्त्यांनी केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली.
लोकशाहीत मतदारच सर्वश्रेष्ठ - नाना पटोले
लोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे. वारंवार काँग्रेसबद्दल मतभेद असल्याबाबत गैरप्रचार करण्यात आला होता. गेल्या ७० वर्षांत काँग्रेसने काहीच केले नाही. गेल्या पाच वर्षांतच विकास झाला, असे चित्र निर्माण केले जात आहे. आज सर्व कार्यक र्ते जोमाने कामाला लागले आहेत. काँग्रेस आघाडीतील सर्व पक्ष एकत्र आल्याने ताकद वाढली आहे. लोकशाहीत मतदारच सर्वश्रेष्ठ असतो, असे प्रतिपादन नागपूर लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.