ठाकरेंच्या नेतृत्वात काँग्रेसचे शिष्टमंडळ दिल्लीत दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 12:09 AM2018-07-26T00:09:12+5:302018-07-26T00:10:22+5:30
काँग्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात एक शिष्टमंडळ बुधवारी दिल्ली येथे दाखल झाले. शिष्टमंडळाने महाराष्ट्र सह प्रभारी आशिष दुआ, सोनल पटेल यांची भेट घेऊन चर्चा केली. उद्या, गुरुवारी अ.भा. संघटन महासचिव अशोक गहलोत व महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेऊन लोकसभा निवडणुकीसाठी पक्षसंघटनेमार्फत सुरू असलेल्या कामाचा आढावा सादर केला जाणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : काँग्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात एक शिष्टमंडळ बुधवारी दिल्ली येथे दाखल झाले. शिष्टमंडळाने महाराष्ट्र सह प्रभारी आशिष दुआ, सोनल पटेल यांची भेट घेऊन चर्चा केली. उद्या, गुरुवारी अ.भा. संघटन महासचिव अशोक गहलोत व महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेऊन लोकसभा निवडणुकीसाठी पक्षसंघटनेमार्फत सुरू असलेल्या कामाचा आढावा सादर केला जाणार आहे.
शिष्टमंडळाने सह प्रभारी आशिष दुआ व सोनल पटेल यांची भेट घेत शहर काँग्रेसने गेल्या चार वर्षांत शहरात केलेली विविध आंदोलने, राबविलेले उपक्रम याची माहिती दिली. शहरातील प्रत्येक बूथवर अध्यक्ष व कार्यकारिणी स्थापन करण्यात आल्याचे सांगितले. भाजपाने दिलेल्या फसव्या आश्वासनांची जनतेत जाऊन पोलखोल करण्यासाठी काँग्रेसची टीम कामाला लागली असल्याचे सांगत सक्रिय कार्यकर्त्यांना योग्य पद देऊन प्रोत्साहन देण्याची मागणी विकास ठाकरे यांनी केली. यावेळी उमाकांत अग्निहोत्री, अभिजित वंजरी, संदीप सहारे, संजय महाकाळकर, हरीश ग्वालबन्सी, नितीश ग्वालबन्सी, योगेश तिवारी, मनोज सांगोळे, प्रशांत धवड, प्रवीण गवरे, पंकज लोणारे, विवेक निकोसे, सूरज आवळे, राज खत्री, आसीफ शेख, हर्षल पाल, प्रशांत उके, प्रवीण सांदेकर आदी उपस्थित होते.