सदस्य जोडो अभियान : पक्षाच्या लोकप्रतिनिधींना आवाहननागपूर : भाजपच्या सदस्य अभियानापाठोपाठ काँग्रेसनेही पक्ष संघटना बळकट करण्यासाठी पक्षनिधी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी निधी संकलन अभियान हाती घेतले आहे. निवडून आलेले पक्षाचे स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी, आमदार व खासदार अशा लोकप्रतिनिधींना एक महिन्याचे मानधन पक्ष निधीत जमा करण्याचे आवाहन केले आहे.पक्ष सूत्रांनी दिलेल्या महितीनुसार याबाबतचे आदेश दिले आहे. यात पक्षाचे आमदार, खासदारांसोबतच नगर परिषद, महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, पक्षाचे पदाधिकारी आदींचा समावेश आहे. जे लाभाच्या पदावर कार्यरत आहेत तसेच प्रदेश व शहर कार्यकारिणी सदस्यासोबतच निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्यांना ३०० रुपये पक्षनिधीत जमा करावे लागणार आहे. सक्रिय सदस्यासाठी १०० तर प्राथमिक सदस्यत्वासाठी ५ रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)नगरसेवक नाराजपक्षाच्या या निर्णयावर काही नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली आहे. १०० ते २०० रुपये देण्याची तयारी आहे. परंतु एक महिन्याचे मानधन वाजवी नसल्याचे त्यांनी सांगितले.जून महिन्यात निवडणूकप्रदेश काँग्रेस कमिटीचे निर्देश योग्यच आहे. पक्षाच्या लोकप्रतिनिधींना केवळ एक महिन्याचे मानधन द्यावे लागणार आहे. याबाबतचे पत्र सर्व नगरसेवकांना पाठविले जाईल, अशी माहिती शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विकास ठाकरे यांनी दिली. पक्ष सदस्य नोंदणीच्या माध्यमातून अधिकाधिक सदस्य बनविण्याचा प्रयत्न आहे. पक्षाचे सदस्य असलेल्यांनाच जून महिन्यातील संघटनेच्या निवडणुकीत सहभागी होता येईल, असेही ते म्हणाले.
काँग्रेसने मागितले एक महिन्याचे मानधन
By admin | Published: April 07, 2015 2:10 AM