लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहर काँग्रेसतर्फे शुक्रवारी व्हेरायटी चौक सीताबर्डी येथे महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून व मेणबत्ती प्रज्वलित करून चिनी सैन्याच्या हल्ल्यात शहीद झालेल्या सैनिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी चिनी सैन्याने बळकावलेली भारतीय भूमी केंद्र सरकारने परत घ्यावी, अशी मागणीही करण्यात आली.कॉँग्रेसचे शहर अध्यक्ष आ. विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात पार पडलेल्या या कार्यक्रमात पक्षाचे महासचिव मुन्ना रामकिसन ओझा, गिरीश पांडव,अॅड.अभिजीत वंजारी, प्रशांत धवड, डॉ. गजराज हटेवार, महेश श्रीवास,रवी गाडगे पाटील, राजेश कुंभलकर, माजी नगरसेवक किशोर गजभिये, वासुदेव ढोके, चंद्रकांत हिंगे, ईरशाद अली, डॉ. मनोहर तांबुलकर, अॅड अक्षय समर्थ, किशोर गीद, अॅड अभय रणदिवे, ज्ञानेश्वर ठाकरे, युवराज वैद्य,राजेश पौनीकर, प्रविण गवरे, दिनेश तराळे, मोतीराम मोहाडीकर,विश्वेश्वर अहिरकर, पंकज थोरात, रजत देशमुख, पंकज निघोट, प्रमोदसिंग ठाकरे, देवेद्र रोटेले,ईरशाद मलिक, सुनीता ढोले, अब्दुल शकील, सुनील पाटील, जॉन थॉमस, राजाभाऊ चिलाटे, पिंटू तिवारी, पियुष गजभिये, धरम पाटील, कुमार बावनकर, डॉ. प्रकाश ढगे, पंकज पांडे,आकाश कथलकर आदींचा समावेश होता.
चीनने बळकावलेली भूमी परत घेण्याची काँग्रेसची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2020 9:55 PM
शहर काँग्रेसतर्फे शुक्रवारी व्हेरायटी चौक सीताबर्डी येथे महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून व मेणबत्ती प्रज्वलित करून चिनी सैन्याच्या हल्ल्यात शहीद झालेल्या सैनिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी चिनी सैन्याने बळकावलेली भारतीय भूमी केंद्र सरकारने परत घ्यावी, अशी मागणीही करण्यात आली.
ठळक मुद्देशहिदांना श्रद्धांजली अर्पण