आदिवासी भागाला महत्व देण्यासाठी काँग्रेसची विभागीय बैठक गडचिरोलीत
By कमलेश वानखेडे | Published: January 12, 2024 07:31 PM2024-01-12T19:31:38+5:302024-01-12T19:31:54+5:30
२० जानेवारी रोजी प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथला घेणार आढावा
नागपूर : २० जानेवारी रोजी नागपुरात होणार असलेली काँग्रेसची विभागीय आढावा बैठक आता गडचिरोली येथे होणार आहे. आदिवासी भागाला महत्व देण्यासाठी प्रदेश काँग्रेसने संबंधित बदल केला आहे. प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराजा सेलिब्रेशन हॉल ॲण्ड लॉन, धानोरा रोड, गडचिरोली येथे सकाळी १०.३० वाजता ही बैठक होईल.
लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाकडून सुरू असलेल्या तयारीचा आढावा घेण्यासाठी पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला हे १८ ते २० जानेवारी, असे तीन दिवस विदर्भाच्या दौऱ्यावर येत आहेत. १८ जानेवारी रोजी अमरावती येथे तर २० जानेवारीला गडचिरोली येथे विभागीय आढावा बैठक घेणार आहेत. १९ जानेवारी रोजी ते नागपुरात असतील. यावेळी स्थानिक पदाधिकाऱ्यांशी ते व्यक्तिगत भेटी घेणार आहेत. या दोन्ही बैठकांना प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यासह स्थानिक माजी मंत्री व प्रमुख नेते उपस्थित राहतील.