नागपूर : कुही नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत काँग्रेसने बाजी मारली आहे. नगराध्यक्षपदी कॉंग्रेसच्या हर्षा इंदोरकर तर उपाध्यक्षपदी अमित ठवकर विजयी झाले.१७ सदस्यीय कुही नगरपंचायतीत काँग्रेसचे ८, भाजपा व राष्ट्रवादीचे प्रत्येकी चार तर एक अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे. नगराध्यक्षदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसने कॉंग्रेसला साथ दिली. इंदोरकर यांना १३ तर भाजपच्या नेहा मनसारे यांना ४ मते मिळाली.
उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत कॉंग्रेसचे अमित ठवकर यांना १३ तर भाजपचे निखिल येळणे यांनी ३ मते मिळाले. भाजपच्या वर्षा धनजोडे या तटस्थ राहिल्या.निवडणुकीत पीठासीन अधिकारी म्हणून उमरेडचे उपविभागीय अधिकारी चंद्रभान खंडाईत व कुही नगरपंचायतच्या मुख्याधिकारी सुषमा मांडगे यांनी काम पाहिले.
कॉंग्रेसचा जल्लोष
नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर कुही शहरात कॉंग्रेसच्या वतीने जल्लोष करण्यात आले. आ.राजू पारवे यांच्या नेतृत्वात विजयी मिरवणूक काढण्यात आली. महादेव जिभकाटे, हरीश कढव, विलास राघोर्ते, दीपक केणे, देवाजी ठवकर, बाबा पठाण, सूर्यमनी वासनिक आदी यात सहभागी झाले होते.