नागपुरात काँग्रेसने दिले धरणे : ‘राफेल’ खरेदीत ४१ हजार कोटींचा घोटाळा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2018 09:02 PM2018-09-12T21:02:14+5:302018-09-12T21:06:25+5:30
यूपीए सरकारच्या काळात राफेल विमान खरेदीसाठी प्रति विमान ५२६ कोटी रुपयांचा करार झाला होता. परंतु भाजपा सरकार आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संरक्षण तज्ज्ञांना न घेता अनिल अंबानी यांना फ्रान्समध्ये घेऊन गेले आणि त्यांनी फ्रान्स सरकारवर दबाब टाकून यूपीए राजवटीत ठरलेली ५२६ कोटींची किंमत वाढवून १६७० कोटी करून आकस्मिक करार केला. असा सुमारे ४१ हजार कोटींचा घोटाळा राफेल विमान खरेदीत झाल्याचा आरोप अ.भा.काँग्रेस कमिटीचे महासचिव मुकुल वासनिक यांनी केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : यूपीए सरकारच्या काळात राफेल विमान खरेदीसाठी प्रति विमान ५२६ कोटी रुपयांचा करार झाला होता. परंतु भाजपा सरकार आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संरक्षण तज्ज्ञांना न घेता अनिल अंबानी यांना फ्रान्समध्ये घेऊन गेले आणि त्यांनी फ्रान्स सरकारवर दबाब टाकून यूपीए राजवटीत ठरलेली ५२६ कोटींची किंमत वाढवून १६७० कोटी करून आकस्मिक करार केला. असा सुमारे ४१ हजार कोटींचा घोटाळा राफेल विमान खरेदीत झाल्याचा आरोप अ.भा.काँग्रेस कमिटीचे महासचिव मुकुल वासनिक यांनी केला.
राफेल विमान घोटाळा जनतेसमोर मांडण्यासाठी काँग्रेसतर्फे बुधवारी संविधान चौकात धरणे देत निदर्शने करण्यात आली. यावेळी अ.भा.काँग्रेस कमिटीचे महासचिव मुकुल वासनिक,माजी केंद्रीय राज्यमंत्री विलास मुत्तेमवार, शहर अध्यक्ष विकास ठाकरे, जिल्हाध्यक्ष राजेद्र मुळक, प्रदेश उपाध्यक्ष अनंतराव घारड, बाबूराव तिडके, नाना गावंडे, विशाल मुत्तेमवार, अॅड.अभिजित वंजारी, उमाकांत अग्निहोत्री, अतुल लोढे, अतुल कोटेचा आदी उपस्थित होते.
यावेळी वासनिक म्हणाले, अवध्या १० दिवसात नोंदणी झालेल्या अनिल अंबानी यांच्या कंपनीला या कामाचा काहीही अनुभव नसतानाही राफेल विमानाचा कंत्राट देण्यात आला. यात उघडउघड मोठा भ्रष्टाचार आहे. याची चौकशी करून सत्य बाहेर आणण्याची मागणी त्यांनी केली.
आंदोलनात डॉ.गजराज हटेवार, प्रा.दिनेश बानाबाकोडे,उपाध्यक्ष बंडोपंत टेंभुर्णे, जयंत लुटे, अशोकसिंग चव्हाण,संजय महाकाळकर,दीपक वानखेडे, माजी महापौर नरेश गावंडे, रमण पैगवार, रमेश पुणेकर, दयाल जसनानी, अॅड.अक्षय समर्थ, अब्दुल शकील, किशोर गीद, बॉबी दहीवाले,अरविंद वानखेडे, मोतीराम मोहाडीकर, अण्णाजी राऊत, पंकज निघोट, वैभव काळे, महेश श्रीवास, पंकज थोरात, प्रसन्ना जिचकार, प्रभाकर खापरे, राहुल खापेकर, राजेद्र नंदनकर, विवेक निकोसे, इरशाद मलिक, सुनील दहीकर, अमित पाठक, कुमार बोरकुटे,रवी गाडगे पाटील, राजेश कुंभलकर, प्रा.अनिल शर्मा, इरशाद अली, प्रकाश बांते, किरण गडकरी, देवा उसरे, मिलिंद दुपारे, कमलेश लारोकर, लोहावेत गुरुजी, अजय नासरे, प्रशांत धाकणे यांच्यासह पदाधिकारी, नगरसेवक, माजी नगरसेवक आदी सहभागी झाले होते.
रास्ता रोकोचा प्रयत्न
धरणे आंदोलनादरम्यान नेत्यांची भाषणे संपल्यावर विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी एकाएक रास्ता रोको करण्यासाठी धाव घेतली. मात्र, पोलिसांनी आधीच संविधान चौकात रस्त्याच्या कडेला बॅरिकेडस् लावले होते. मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात होता. रस्त्याकडे धाव घेणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी रोखून धरले. कार्यकर्त्यांनी बॅरिकेडस् तोडण्याचा प्रयत्न केला. यावेळी कार्यकर्ते व पोलिसांत खटकेही उडाले. कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत राफेल घोटाळ्याचा निषेध केला.