शहरं
Join us  
Trending Stories
1
धनंजय मुंडे यांच्या २०१९ च्या शपथपत्रात तीन, तर २०२४ मध्ये पाच अपत्यांचा उल्लेख!
2
कर्नाटक आर्थिक संकटात! जेवढी द्यायची ऐपत, तेवढीच आश्वासने द्या...; खर्गेंनी महाराष्ट्रावरून नेत्यांचे कान टोचले
3
"मी ठासून सांगतोय माघार घेणार नाही"; वर्षा बंगल्यावरील भेटीनंतर सरवणकरांची स्पष्ट भूमिका
4
Maharashtra Election 2024: महाविकास आघाडीचा गेम बिघडवणार?; ११ बंडखोर कोण आहेत?
5
पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या अध्यक्षांचे निधन; मोदींकडून शोक व्यक्त
6
तरुणीचा व्हिडीओ कॉल उचलला आणि हनिट्रॅपमध्ये अडकले मंत्री, त्यानंतर घडलं असं काही...
7
Video - "RC, ड्रायव्हिंग लायसन्सची गरज नाही, पकडलं तर फक्त भाजपाची डायरी दाखवा, पोलीस..."
8
Gautam Adani News : अदानींनी नेमकं केलंय तरी काय? 'या' कंपनीच्या मागे का लागल्यात PNB, ICICI सारख्या बँका?
9
'सुंदर' चेंडू अन् 'कॉपी पेस्ट फॉर्म्युला'! टॉम लॅथमसह रचिन झाला क्लीन बोल्ड (VIDEO)
10
कार्तिक आर्यन-विद्या बालनचा 'भूल भूलैय्या ३' कसा आहे? पहिला Review आला समोर
11
ई-स्कूटर घ्या; पण तक्रारींचे काय? कंपन्यांविराेधात १२ हजार तक्रारी, केंद्र सरकार करणार चाैकशी
12
IND vs NZ : भारताची आपल्या घरात 'कसोटी' तरी बुमराहला का विश्रांती? BCCI ने सांगितलं महत्त्वाचं कारण
13
गुरु-शुक्राचा राजयोग: ९ राशींना सुखकर, दिवाळीनंतरही लाभ; उत्पन्न वाढ, नवीन नोकरीची संधी!
14
शरद पवारांच्या भेटीसाठी बारामतीत मोठी गर्दी; गोविंदबागेत उभे रहायलाही जागा नाही...
15
आधी बारावी, मग नववी; अस्लम शेख यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप, विनोद शेलार कोर्टात जाणार  
16
भेटायला आले, नमस्कार केला अन् गोळ्या झाडल्या; दिवाळी साजरी करणाऱ्या काका-पुतण्याची हत्या
17
मनसे कार्यकर्त्यांनी मनसेच्या उमेदवाराचेच कार्यालय फोडले; अकोल्यात मोठा राडा, नेमके काय घडले...
18
अर्जुन कपूरने ब्रेकअप झाल्याचं सांगताच मलायकाची पोस्ट, म्हणते - "एका क्षणासाठी..."
19
मी कुठे सांगतो माझा प्रचार करा, विरोध अपेक्षितच; नवाब मलिक भाजप नेत्यांवर कडाडले
20
HDFC Bankची उपकंपनी HDB फायनान्शिअल सर्व्हिसेस आणणार IPO; 'इतके' हजार कोटी उभे करणार

काँग्रेसने नेत्यांची गरिबी दूर केली : देवेंद्र फडणवीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2019 11:31 PM

इंदिरा गांधी यांच्या सरकारपासून गरिबी हटावचा नारा काँग्रेस पक्ष देत आहे. या निवडणुकीत राहुल गांधी यांचाही तोच नारा आहे. ६० वर्षे देश हातात देऊनही देशातून गरिबी दूर केली नाही. काँग्रेस पक्षाने गरिबी दूर केली ती काँग्रेसच्या नेत्यांची आणि चेल्याचपाट्यांची, अशी परखड टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

ठळक मुद्देउत्तर नागपुरातील सभेत टीका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : इंदिरा गांधी यांच्या सरकारपासून गरिबी हटावचा नारा काँग्रेस पक्ष देत आहे. या निवडणुकीत राहुल गांधी यांचाही तोच नारा आहे. ६० वर्षे देश हातात देऊनही देशातून गरिबी दूर केली नाही. काँग्रेस पक्षाने गरिबी दूर केली ती काँग्रेसच्या नेत्यांची आणि चेल्याचपाट्यांची, अशी परखड टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.नागपूर लोकसभेचे उमेदवार नितीन गडकरी यांच्या प्रचारार्थ गुरुवारी उत्तर नागपुरात आयोजित सभेत ते बोलत होते. सभेला आ. डॉ. मिलिंद माने, माजी राज्यमंत्री अ‍ॅड. सुलेखा कुंभारे, वीरेंद्र कुकरेजा, डॉ. विंकी रुगवानी, राजन वाघमारे, बाळू घरडे, नवनीतसिंग तुली आदी उपस्थित होते.यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, राजीव गांधी पंतप्रधान असताना ते म्हणायचे की मी दिल्लीतून एक रुपया पाठवायचो तर १५ पैसे जनतेला भेटायचे. पण भाजपाच्या सरकारने डीबीटी योजना सुरू करून, ८० हजार कोटी रुपयांच्या योजनेचा पूर्णपणे लाभ जनतेला मिळाला. उज्ज्वला योजनेतून गॅस, उजाला योजनेतून वीज, पंतप्रधान आवास योजनेतून घर गरिबांना भाजप सरकारने दिले. स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून देशात ९८ टक्के शौचालय बांधण्यात आली. मुद्रा योजनेच्या माध्यमातून १२ कोटी लोकांना विनातारण कर्ज उपलब्ध झाले. याचा खऱ्या अर्थाने लाभ गरीब जनतेला झाला. काँग्रेसने बाबासाहेबांच्या नावावर राजकारण केले, सत्ता मिळविली. पण चैत्यभूमीजवळील बाबासाहेबांच्या स्मारकासाठी जागा काँग्रेसने दिली नाही. भाजपाच्या सरकारने अवघ्या तीन दिवसात ३४०० कोटी रुपयांची इंदू मिलची जागा स्मारकाला दिली. अलीपूरचे घर बाबासाहेबांचे स्मारक बनले, लंडनमधील बाबासाहेबांचे घर खरेदी केले. त्याचबरोबर अनुसूचित जातीचे आरक्षण, पदोन्नती, अ‍ॅट्रॉसिटी कायदा अडचणीत आला त्यावेळी आमच्या सरकारने समाजाचे प्रोटेक्शन केले. सामाजिक न्याय हा भाषणात मांडायचा नसतो, तो आपल्या कर्तृत्वात असावा लागतो. भाजपाने सत्तेत आल्यानंतर खऱ्या अर्थाने सामाजिक न्याय घडवून आणल्याचे फडणवीस म्हणाले. निवडणूक आली की काँग्रेसवाले आरोप करतात की संविधान बदलतील, आरक्षण संपवतील, पण बाबासाहेबाचे संविधान इतके मजबूत आहे की, ते कुणीही बदलवू शकत नाही.एअर स्टाईकसंदर्भात बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, एअर स्ट्राईकसंदर्भात जगात दोघांनाच शंका आहे. एक पाकिस्तान आणि दुसरी काँग्रेस. हल्ले झाले हे मोदींनी नाही सांगितले, ते सेनेच्या प्रमुखांनी सांगितले. पण काँग्रेसला सेनेच्या लोकांवरही भरवसा नसल्याची टीका फडणवीस यांनी केली. यावेळी त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यावर टीका केली.राजकारण हे समाजसेवेचे माध्यम : नितीन गडकरीराजकारण हे केवळ सत्ताकारण नसून समाजसेवेचे प्रभावी माध्यम आहे ,असा माझा विश्वास आहे. म्हणूनच गोरगरीब वंचितांच्या समस्यांना जो आपले मानतो आणि पोटतिडकीने यांच्या समस्या सोडवितो त्यालाच जनता स्वीकारते, असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. वसंतनगर येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. गडकरी पुढे म्हणाले, समाजामध्ये अनेक समस्या आहेत, पण या समस्यांची जाण असणारी माणसे मात्र दुर्दैवाने कमी आहेत. मी ज्या संस्कारात आणि परिवारात वाढलो, ज्या पक्षाने आणि पक्षातील कार्यकर्त्यांनी माझ्यावर प्रेम केले, त्या अनेक जिव्हाळ्याच्या माणसांमुळे मी लोककल्याणकारी कामे करू शकलो. त्यामुळे आपल्याला चिंता नसून नागपूरच्या जनतेवर पूर्ण विश्वास असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी आ. सुधाकर कोहळे, माजी खा. प्रकाश जाधव, माजी आ. मोहन मते, किशोर कुमेरिया, रमेश सिंगारे, विशाखा बांते, भारती बुंडे, वंदना भगत आदी उपस्थित होते.

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस