पाण्यासाठी काँग्रेसची नागपूर मनपावर धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2019 09:05 PM2019-03-02T21:05:39+5:302019-03-02T21:06:50+5:30
मागील पाच वर्षात शहरातील सर्व भागात समान पाणी वितरण करावयाचे होते. या कालावधीत ८० कोटी खर्च करावयाचे होते. मात्र ३० कोटींचा खर्च झाला. यामुळे शहरातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. अनेक वस्त्यात दूषित पाणीपुरवठा होत आहे. साफसफाईची नियमित होत नाही. मालमत्ता व पाणीपट्टीत झालेली प्रचंड दरवाढ या विरोधात शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने शनिवारी महापालिका मुख्यालयावर धडक मोर्चा काढून निदर्शने करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मागील पाच वर्षात शहरातील सर्व भागात समान पाणी वितरण करावयाचे होते. या कालावधीत ८० कोटी खर्च करावयाचे होते. मात्र ३० कोटींचा खर्च झाला. यामुळे शहरातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. अनेक वस्त्यात दूषित पाणीपुरवठा होत आहे. साफसफाईची नियमित होत नाही. मालमत्ता व पाणीपट्टीत झालेली प्रचंड दरवाढ या विरोधात शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने शनिवारी महापालिका मुख्यालयावर धडक मोर्चा काढून निदर्शने करण्यात आली.
२४ बाय ७ योजनेंतर्गत घरोघरी नळ देण्याचे काम अजूनही ६० टक्के झालेले आहे. निर्धारित कालावधीत काम पूर्ण न झाल्यास दंड आकारणी तरतूद असतानाही ओसीडब्ल्यूला दंड आकारण्यात आलेला नाही. प्रक ल्पामुळे महापालिकेला ५८ कोटींचे नुकसान झाल्याचा आरोप आंदोलकांनी केला. तसेच सायबरटेक कंपनीने मालमत्ता सर्वेक्षण चुकीचे केले. मालमत्ता व पाणी कराची करवाढ मागे घ्यावी. सफाईची जबाबदारी असलेल्या कनक रिसोर्सेस कंपनीकडून स्वच्छतेचे काम व्यवस्थित होत नसल्याने कंपनीवर कारवाई करण्याची मागणी शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केली.
शिष्टमंडळात शहर काँग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे, प्रदेश चिटणीस उमाकांत अग्निहोत्री, माजी विरोधी पक्षनेता संजय महाकाळकर,प्रदेश प्रतिनिधी अॅड अभिजित वंजारी,नगरसेवक संदीप सहारे, रमेश पुणेकर, मनोज सांगोळे, प्रा. दिनेश बानाबाकोडे, अॅड. नंदा पराते, स्नेहा निकोसे,भावना लोणारे, जयंत लुटे, सुजाता कोंबाडे, ईरशाद अली, दर्शनी धवड, रश्मी धुर्वे, उज्ज्वला बनकर, मिलिंद सोनटक्के, हरीश ग्वालवंशी, हर्षला सांबळे, नेहा सेजुळ, अनिल पांडे, सेवादलाचे अध्यक्ष रामगोविंद खोब्रागडे, रमण पैगवार, नितीश ग्वालवंशी, गुडडू तिवारी, दीपक वानखेडे, अॅड. अशोक यावले, राजेश कुंभलकर, अशरफ खान, प्रशांत कापसे, पंकज निघोट, पंकज थोरात, आकाश तायवाडे, राजेश पौनीकर, विवेक निकोसे, छाया सुखदेवे, रिचा जैन, विना बेलगे, अतीक मलीक, अब्दुल शकील, किशोर गीद, सुनिता ढोले, रवि गाडगे पाटील, अभिजित ठाकरे, संजना देशमुख, वसीम खान, स्नेहल दहीकर, तनवीर अहमद, राकेश पन्नासे, अॅड. अभय रणदिवे, स्नेहल दहीकर, गोपाल पट्टम, प्रसन्ना बोरकर, मामा गांवडे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी होते.