शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआत उद्धव ठाकरेंवर दबाव?; ठाकरे गटाच्या नेत्याचा काँग्रेसला गर्भित इशारा
2
जितेंद्र आव्हाडांकडून खळबळजनक ऑडिओ क्लिप पोस्ट; अक्षय शिंदेची हत्या झाल्याचा दावा
3
₹100000 पार जाणार सोन्याचा भाव...? दिसतोय US Fed च्या निर्णयाचा परिणाम! या वर्षात झाली 30% वाढ
4
आता IPL मधून माघार घेणाऱ्या खेळाडूला मोजावी लागणार मोठी किंमत; जाणून घ्या नवा नियम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना पितृपक्षाची शुभ सांगता, ऑक्टोबर आणेल अच्छे दिन; अपार यश-लाभ!
6
IND vs BAN T20 : ऋतुराज गायकवाडला पुन्हा डच्चू! चाहत्यांचा रोष; चांगली कामगिरी असूनही वगळलं
7
भाजपाने अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा आमदार फोडला; विधानसभा निवडणुकीपूर्वीच मोठा झटका दिला
8
"CSK च्या चाहत्यांसाठी दुःखाची बाब आहे पण...", गंभीरची जागा घेताच ड्वेन ब्राव्हो भावुक
9
पितृपक्ष: एकाच दिवशी प्रदोष शिवरात्री शुभ संयोग; कसे करावे व्रत? पाहा, महात्म्य अन् मान्यता
10
टेक ऑफला वैमानिकाचा नकार; उद्योगमंत्री सामंत गेले मोटारीने, मालकाला फोन लावला तरी...
11
अमेरिकेनं दिलेल्या 5000 पाउंड वजनाच्या 'स्पेशल गिफ्ट'नं मरला गेला नसरल्लाह! इराणचा मोठा दावा
12
Video: पगार ६० लाख पण जगणं कठीण; कॅनडात भारतीयांना पैसे पुरेना, कारण काय?
13
कोल्हापूर : दोन्ही आघाड्यांच्या संभाव्य उमेदवारांचे चित्र स्पष्ट; सहा मतदारसंघात बंडखोरीची शक्यता
14
IND vs BAB, 2nd Test, Day 3 : तिसऱ्या दिवशी तरी खेळाडू मैदानात उतरणार का?
15
कोल्डप्ले तिकिट विक्री वादावर Book My Show चं स्पष्टीकरण; काळाबाजाराचा आरोप
16
मित्राकडून हातपाय बांधले, व्हिडिओ बनवला अन् कुटुंबाकडे मागितले २५ लाख, त्यानंतर...
17
IPL 2025 Player Retention Rules : MI सह CSK च्या मनासारखं; इथं पाहा नवी नियमावली
18
IIFA 2024: शाहरुख ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता तर 'हा' ठरला सर्वोत्कृष्ट सिनेमा, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
19
ही तुमच्या कर्माची फळे, जगाला दोष देऊ नका; भारतानं पाकिस्तानला सुनावले खडे बोल
20
फिनालेला आठवडा असताना बिग बॉस मराठीमध्ये मोठा बदल! ३ ऑक्टोबरपासून या नवीन वेळेत दिसणार

सरकारला घेरण्यासाठी काँग्रेसची विदर्भात मोर्चेबांधणी

By admin | Published: November 03, 2015 3:39 AM

एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या विदर्भात मागील काही वर्षांत काँग्रेस माघारली आहे. काँग्रेसला मजबूत

नागपूर : एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या विदर्भात मागील काही वर्षांत काँग्रेस माघारली आहे. काँग्रेसला मजबूत करण्यासोबतच राज्य सरकारला विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात घेरण्यासाठी प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी विदर्भात मोर्चेबांधणी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर प्रदेश काँग्रेसची विदर्भस्तरीय बैठक ६ नोव्हेंबरला नागपुरातील राणीकोठी येथे आयोजित करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रभावामुळे विदर्भात भाजपची स्थिती सुधारली आहे. अशापरिस्थितीत आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यातील सत्ता हस्तगत करण्यासाठी विदर्भात काँग्रेसची नव्याने बांधणी करावी लागणार आहे. यासाठी विदर्भातील जनतेशी निगडित प्रश्न व शेतकऱ्यांच्या ज्वलंत समस्या तसेच महागाईच्या मुद्यावरून अधिवेशनात सरकारला घेरण्याची व्यूहरचना काँग्रेस आखत आहे. अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या ६ नोव्हेंबरच्या बैठकीला विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह विदर्भाच्या ११ जिल्ह्यातील पक्षाचे आजी-माजी आमदार, खासदार, पक्षाचे जिल्हा अध्यक्ष, शहर अध्यक्ष व निवडक पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. बैठकीला येताना पदाधिकाऱ्यांनी आपल्या जिल्ह्यातील प्रश्न, कापूस संकलन केंद्र सुरू करणे, सोयाबीनला योग्य भाव, सरकारने जाहीर केलेली नुकसानभरपाई अजूनही सर्व शेतकऱ्यांना मिळालेली नाही. विदर्भातील महापालिका व नगरपालिकांच्या समस्या याबाबतची समरी सोबत आणण्याची सूचना पक्षातर्फे करण्यात आलेली आहे. सोमवारी नगरपालिकांचे निवडणूक निकाल जाहीर झाले. विदर्भात काँग्रेसला अपेक्षेपेक्षा अधिक यश मिळाले. वर्ष-दीड वर्षानंतर जिल्हा परिषद व महापालिकांच्या निवडणुका आहेत. यानिमित्ताने यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)