नागपुरात काँग्रेसचा मोर्चा, प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंना पोलिसांनी ताब्यात घेतले

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2023 04:56 PM2023-12-08T16:56:57+5:302023-12-08T17:09:07+5:30

नागपुरात युवा काँग्रेसने केंद्र सरकार आणि राज्य सरकार विरोधात मोर्चा काढला आहे.

Congress march in Nagpur, state president Nana Patole detained by police | नागपुरात काँग्रेसचा मोर्चा, प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंना पोलिसांनी ताब्यात घेतले

नागपुरात काँग्रेसचा मोर्चा, प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंना पोलिसांनी ताब्यात घेतले

नागपूर-  नागपुरात युवा काँग्रेसने केंद्र सरकार आणि राज्य सरकार विरोधात मोर्चा काढला आहे. पोलिसांनी युवा मार्चाच्या पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. या मोर्चात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची उपस्थिती आहे. दरम्यान, नाना पटोले यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यावेळी सरकारविरोधात आंदोलकांनी घोषणाबाजी सुरू केली होती.

या मोर्चात काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. तरुणांच्या मागण्यांसाठी हे आंदोलन केले आहे, ऑनलाईन पेपर, महागाई, बेरोजगारी याविरोधात हा मोर्चा काढण्यात आला आहे. पेपरफुटी प्रकरणात आरोपींवर कारवाई करण्याची मागणी या आंदोलकांनी केली आहे. 

अनेक खासदार स्वत:चे प्रश्न स्वत: तयार करत नाहीत, मी देखील; महुआंच्या चर्चेवेळी जदयू खासदाराचा गौप्यस्फोट

यावेळी बोलताना नाना पटोले म्हणाले, तरुणांना न्यान मिळवून देणार. फडणवीस सरकारचे हे पाप आहे. या राज्यातील तरुण आणि तरुणींचे बेरोजगारीचे प्रश्न आम्ही सभागृहात आणि रस्त्यावर मांडणार आहे, असंही पटोले म्हणाले. 

"सरकार महागाई आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर दुर्लक्ष करण्यासाठी काहीही करत आहे. सरकार शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळत असल्याचा आरोपही नाना पटोले यांनी केला.

Web Title: Congress march in Nagpur, state president Nana Patole detained by police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.