पोलीस ठाणे व सदनिका उद्घाटनसोहळ्यात काँग्रेस आमदार अनुपस्थित; भाजपकडून ‘क्रेडिट शो’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2023 08:00 AM2023-05-13T08:00:00+5:302023-05-13T08:00:06+5:30

Nagpur News लकडगंज येथील ‘स्मार्ट’ पोलीस ठाणे व पोलीस सदनिकांच्या उद्घाटनाचा सोहळा हा राजकीय फटकेबाजीमुळे चांगलाच रंगला. या कार्यक्रमाला काँग्रेसचे एकही आमदार किंवा माजी आमदार उपस्थित नव्हते.

Congress MLA absent from police station and house opening ceremony; 'Credit show' from BJP | पोलीस ठाणे व सदनिका उद्घाटनसोहळ्यात काँग्रेस आमदार अनुपस्थित; भाजपकडून ‘क्रेडिट शो’

पोलीस ठाणे व सदनिका उद्घाटनसोहळ्यात काँग्रेस आमदार अनुपस्थित; भाजपकडून ‘क्रेडिट शो’

googlenewsNext

योगेश पांडे
नागपूर : लकडगंज येथील ‘स्मार्ट’ पोलीस ठाणे व पोलीस सदनिकांच्या उद्घाटनाचा सोहळा हा राजकीय फटकेबाजीमुळे चांगलाच रंगला. या कार्यक्रमाला काँग्रेसचे एकही आमदार किंवा माजी आमदार उपस्थित नव्हते. तर भाजपने या कार्यक्रमाच्या माध्यमातून पुर्व नागपुरातील विकासकामांचा ‘स्मार्ट’ प्रचारच केला. विशेष म्हणजे ‘हेविवेट’ नेत्यांच्या उपस्थितीत ‘क्रेडीट शो’ रंगल्याचीच चर्चा होती.


कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत काँग्रेसचे आमदार अभिजीत वंजारी, नितीन राऊत, विकास ठाकरे यांचीदेखील नावे होती. मात्र यांच्यापैकी एकही आमदार कार्यक्रमाला नव्हता. सोबतच पुर्व नागपुरातील काँग्रेसचे अनेक माजी नगरसेवकदेखील पोहोचले नव्हते. दुसरीकडे भाजपकडून जास्तीत जास्त प्रमाणात उपस्थिती कशी राहील यावर भर देण्यात आला होता.

कार्यक्रम पूर्णत: प्रशासकीय असताना गडकरी व फडणवीस यांचा सत्कार करण्यासाठी कार्यकर्ते व पदाधिकारी मंचावर पोहोचले व प्रशासकीय कार्यक्रम कधी राजकीय झाला हे लक्षातदेखील आले नाही. पुर्व नागपुरचे आ.कृष्णा खोपडे यांनी यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांना चिमटे काढले. स्मार्ट पोलीस ठाणे व निवासी संकुलाचे भूमीपूजन भाजप नेत्यांच्या हाताने झाले होते. नशिबाने आमचे सरकार परत आले, नाही तर महाविकास आघाडीच्या नेते उद्घाटनासाठी टपलेच होते. पोलीस भवनाचे पूर्ण काम आम्ही केले, परंतु उद्घाटन त्यांच्या नेत्यांनी करत ‘क्रेडीट’ लाटण्याचा प्रयत्न केला असे म्हणत खोपडे यांनी यावेळचे ‘क्रेडीट’ भाजपकडेच ठेवण्याचा प्रयत्न केला.

यावेळी ज्या जागेवर हे संकुल उभे झाले आहे त्याबाबतदेखील त्यांनी ‘सूचक’ विधान केले. ही जागा एकेकाळी कचरा फेकण्यासाठी वापरण्यात येत होती. या जागेवर पोर गिल्लीदांडू, कंचे व क्रिकेट खेळायचे. मात्र येथे मोठा प्रकल्प उभारल्या जाऊ शकतो ही बाब माझ्या डोक्यात फार अगोदरपासून होती. मी तत्कालिन सरकारच्या नेत्यांना सांगण्याचा विचारदेखील केला होता. मात्र जर मी जागा दाखविली असती तर ती हडपल्या जाण्याची भिती होती. ‘आज नाही तर उद्या आपले दिवस येतील’, असे मनाला समजावले व मी शांतच राहिलो, असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे महाविकासआघाडीच्या नेत्यांवर टीकास्त्र सोडत राजकीय ‘क्रेडीट’वर परत भाष्य केले.


फडणवीसांचादेखील ‘क्राईम कॅपिटल’वरून टोला
गडकरी व फडणवीस यांनीदेखील या प्रकल्पाचे श्रेय पूर्व नागपुरातील आमदारांना देत पुढील वर्षीच्या निवडणुकीमधील राजकीय शक्यतांचे संकेत दिले. तर फडणवीस यांनी नागपुरला ‘क्राईम कॅपिटल’ असे हिणविणाऱ्या महाविकासआघाडीतील नेत्यांना चांगलाच टोला मारला. नागपुरात एखादा गुन्हा घडला तर मी मी गृहमंत्री असल्याने त्यावर राजकारण सुरू होते. मात्र नागपूर किती शांत शहर आहे हे आरोप करणाऱ्यांनी येथे येऊन अनुभवावे, हे बोलताना त्यांचा रोख विरोधकांकडेच होता.

Web Title: Congress MLA absent from police station and house opening ceremony; 'Credit show' from BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.