शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसची ४८ जणांची पहिली उमेदवार यादी जाहीर; अनेक बड्या नेत्यांचा समावेश 
2
"...तर मी येवल्यातून भुजबळांविरोधात निवडणूक लढवेन", सुहास कांदेंना शिंदे-फडणवीसांचा मेसेज काय?
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; भाजपामधून आलेल्या तिघांना शरद पवारांनी दिली उमेदवारी
4
"त्यांचा इतिहासच गद्दारीचा, आईबापासोबतही..."; छगन भुजबळांचा कांदेंनी काढला इतिहास
5
गुलमर्गमध्ये लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला, 5 जवान जखमी तर एका साथीदाराचा मृत्यू
6
अयोध्येतील 55 घाटांवर 28 लाख दिव्यांची रोषणाई; झळाळून निघणार श्रीराम जन्मभूमी...
7
'भ्रष्टाचार, गुन्हेगारी वाढली', उमेदवारी मिळताच युगेंद्र पवारांनी काकाविरोधात थोपाटले दंड
8
'मविआ'त सांगोला मतदारसंघ कोणाला? जयंत पाटील म्हणाले, "एक-दोन दिवसात..."
9
ना हडपसर, ना खडकवासला...ठाकरे गटात प्रवेश केलेले वसंत मोरेंचा पुढचा प्लॅन ठरला
10
इम्तियाज जलीलांची वेगळीच खेळी; ३ विधानसभा मतदारसंघातून घेतले अर्ज, लोकसभाही लढणार
11
NCP SP Candidate List : राष्ट्रवादी काँग्रेसची (शरद पवार) पहिली यादी जाहीर! कोणाची नावे?
12
पुण्यात ठाकरे गट बंडखोरी करणार?; हडपसर जागेवर राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला, तर...
13
कोरेगावमधून शशिकांत शिंदे; कऱ्हाड दक्षिणमधून अतुल भोसले यांनी भरला अर्ज 
14
शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर; मराठवाड्यात कुणाला संधी? पाहा...
15
बारामतीत हाय व्होल्टेज सामना रंगणार: शरद पवारांकडून युगेंद्र पवारांना उमेदवारी; अजितदादांना भिडणार!
16
शिवडीत अजय चौधरींनाच पुन्हा उमेदवारी; मातोश्रीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचा निर्णय
17
"मला प्रेम करायचंय..."; वयाच्या २२ व्या वर्षीच 'या' अभिनेत्रीने केलंय फॅमिली प्लॅनिंग
18
नाशिकमध्ये महायुतीत बंडखोरी! समीर भुजबळ शिंदेंच्या उमेदवाराविरोधात मैदानात
19
भीषण! गाझातील शाळेवर इस्रायलचा हवाई हल्ला; ११ महिन्यांच्या बाळासह १७ जणांचा मृत्यू
20
पाकिस्तानचे स्वप्न भंगले! रशिया आणि चीनलाही भारतासमोर झुकावे लागले

लहान पक्षांना शेवटपर्यंत ताटकळत ठेवण्याची काँग्रेस-राष्ट्रवादीची भूमिका आघाडीसाठी घातक - सुरेश माने 

By आनंद डेकाटे | Published: March 07, 2024 7:03 PM

आघाडी करताना लहान पक्षांना शेवटपर्यंत ताटकळत ठेवणे हे काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेहमी धोरण राहिले आहे.

नागपूर: आघाडी करताना लहान पक्षांना शेवटपर्यंत ताटकळत ठेवणे हे काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेहमी धोरण राहिले आहे. त्यांची ही भूमिकाच आघाडी होण्यासाठी घातच ठरते, अशी टीका बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचे (बीआरएसपी)चे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष एड. सुरेश माने यांनी गुरूवारी येथे पत्रपरिषदेत केले.

ड. माने म्हणाले, भाजप व संघ परिवार कोणत्याही परिस्थितीत पुन्हा सत्तेत येऊ नये, अशी आमची भूमिका आहे. त्यामुळे आम्ही महाविकास आघाडीसोबत आघाडी करण्यास तयार आहोत. यापूर्वीही आम्ही आघाडीसोबतच होतो. मात्र या निवडणुकीत महाविकास आघाडीने आतापर्यंत तरी आमच्याशी साधी चर्चाही केलेली नाही. इतर छोट्या पक्षांसोबत सुद्धा त्यांची अशीच भूमिका असते. शेवटच्या घटकेत युती होणे हे योग्य राहत नाही. छोट्या पक्षांना निवडणुकीसाठी वेळच मिळत नाही. त्यामुळे हे आघाडीसाठी घातक ठरते.

येत्या १५ मार्च रोजी कांशीराम यांच्या जन्मदिनी पक्षातर्फे नागपुरातील इंदोरा मैदान येथे निवडणुक महासभा आयोजित करण्यात आली आहे. यासभेला राष्ट्रीय शोषित समाज पार्टीचे अध्यक्ष व माजी खासदार स्वामीप्रसाद मौर्य, आयएनएलचे प्रो. मोहम्मद सुलेमान, छोटूभाई वसावा, रामबक्श वर्मा, पृथ्वीराज,साहेबसिंह धनगड प्रामुख्याने उपस्थित राहतील. या सभेत आपण निवडमुकीबाबतची भूमिका जाहीर करू, असे त्यांनी सांगितले. पत्रपरिषदेला राष्ट्रीय उपाध्यक्ष रमेश पाटील, विशेष फुटाणे, विश्रांती झामरे, डॉ. विनोद रंगारी उपस्थित होते.

खरे असाल तर निवडणुकीनंतर भाजपसोबत जाणार नाही लिहून द्यावंचितचे प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेनेला (उद्धव ठाकरे) निवडणुकीनंतर भाजपसोबत जाणार नाही, असे लिहून द्यायला सांगितले आहे. त्यांच्या या वक्तव्याचे समर्थन करीत एड. सुरेश माने यांनी खरे असाल तर निवडणुकीनंतर भाजपसोबत जाणार नाही हे लिहून द्यायला काय हरकत आहे, असे म्हटले. दोघांनीही एकमेकांकडून असे लिहून घेण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले. गेल्या निवडणुकीत वंचितची जी ताकद दिसून आली ती एमआयएमसोबत असल्यामुळे होती. महाविकास आघाडी वंचितला इतके महत्व देत आहे, त्याचे काय होते, ते लवकरच समजेल असेही ते म्हणाले.

टॅग्स :nagpurनागपूर