Tata Airbus project : फडणवीसांच्या काळात विदर्भातील प्रकल्प गुजरातला; काँग्रेस-राष्ट्रवादीची टीका

By कमलेश वानखेडे | Published: October 28, 2022 05:26 PM2022-10-28T17:26:02+5:302022-10-28T17:30:52+5:30

दोन महिन्यात प्रकल्प देणार होते की नेणार होते?

Congress-NCP criticism after Tata Airbus project in Nagpur went to Gujarat during Devendra Fadnavis' tenure | Tata Airbus project : फडणवीसांच्या काळात विदर्भातील प्रकल्प गुजरातला; काँग्रेस-राष्ट्रवादीची टीका

Tata Airbus project : फडणवीसांच्या काळात विदर्भातील प्रकल्प गुजरातला; काँग्रेस-राष्ट्रवादीची टीका

googlenewsNext

नागपूर : वेदांता-फॉक्सकॉनच्या पाठोपाठ नागपुरातील मिहानमध्ये प्रस्तावित टाटा समुहाचा एअरबस प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याचा मुद्यावरून आता काँग्रेस-राष्ट्रवादीने नागपूर-विदर्भ कर्मभूमी असलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घेरले आहे.

वेगळा विदर्भ आणि विदर्भाच्या अनुशेषाच्या मुद्द्यावर आपल्या राजकीय पोळ्या भाजून घेतल्या आहेत. सत्ता, मुख्यमंत्रीपद उपमुख्यमंत्रीपद मिळाल्यावर मात्र त्यांना विदर्भाचा विसर पडतो. विदर्भातील जनतेची मते घेऊन विदर्भात येणारे प्रकल्प गुजरातला पाठवण्याचे काम फडणवीस करत आहेत, अशी बोचरी टीका काँग्रेस-राष्ट्रवादीने केली आहे.

काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे म्हणाले, फडणवीसांसाठी विदर्भातील जनतेपेक्षा गुजरातच्या साहेबांचे आदेश महत्वाचे आहेत. त्यामुळे त्यांनी पुढची निवडणूक गुजरातमधूनच लढवावी. फडणवीस पाच वर्ष मुख्यमंत्री असताना एकही मोठा प्रकल्प विदर्भात आला नाही. विदर्भातल्या तरुणांना रोजगार मिळाला नाही. रामदेवबाबा यांच्या पतंजलीचा मोठा प्रकल्प नागपूर मध्ये येणार असे सांगितले होते, पण तो अद्याप साकारला नाही. अमरावतीतील टेक्सटाईल पार्क औरंगाबादच्या ऑरिक सिटीमध्ये घेऊन जाण्याचा घाट शिंदे फडणवीस सरकारने घातला असल्याचा आरोपही काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला.

राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष दुनेश्वर पेठे म्हणाले, टाटा एअरबसचा २२ हजार कोटी रुपयांचा प्रकल्प गुजरातला गेल्याने विदर्भाचे प्रचंड नुकसान होणार आहे. विदर्भातील तरुणांना नोकरी, रोजगारासाठी मुंबई पुणे औरंगाबाद यासारख्या मोठ्या शहरांची वाट धरावी लागणार आहे. वेदांता-फॉक्सकॉन महारष्ट्रतून गेला तेव्हा लवकरच महराष्ट्रात नवा प्रकल्प देणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, प्रकल्प देण्याऐवजी पळविण्याचे काम सुरू असल्याची टीका पेठे यांनी केली.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: Congress-NCP criticism after Tata Airbus project in Nagpur went to Gujarat during Devendra Fadnavis' tenure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.