खूप लढलो बेकीने आता लढूया एकीने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2019 09:33 PM2019-10-28T21:33:17+5:302019-10-28T21:37:08+5:30
विधानसभा निवडणुकीचे निकाल हे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेससाठी ऊर्जा देणारे ठरले आहे. आतापर्यंत एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी न दवडणाऱ्या नेत्यांनी यापुढे एकजुटीने लढण्याचा संकल्प केला आहे. दिवाळी निमित्त आयोजित दिवाली मिलन खऱ्या अर्थाने या दोन्ही पक्षाच्या नेत्यांचे मनोमीलन ठरले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विधानसभा निवडणुकीचे निकाल हे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेससाठी ऊर्जा देणारे ठरले आहे. आतापर्यंत एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी न दवडणाऱ्या नेत्यांनी यापुढे एकजुटीने लढण्याचा संकल्प केला आहे. दिवाळी निमित्त आयोजित दिवाली मिलन खऱ्या अर्थाने या दोन्ही पक्षाच्या नेत्यांचे मनोमीलन ठरले.
आ. अनिल देशमुख यांच्या पुढाकाराने शनिवारी रामदासपेठ येथील ‘विष्णुजी की रसोई’ येथे विधानसभेत निवडूण आलेले, तसेच काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व उमेदवारांचा सत्कार आणि दिवाली मिलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला प्रामुख्याने माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, नितीन राऊत, अनिल देशमुख, शहराध्यक्ष आ. विकास ठाकरे, जिलाह अध्यक्ष राजेंद्र मुळक, माजी मंत्री रमेश बंग, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबा गुजर आणि विधानसभा निवडणुकीतील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व उमेदवार उपस्थित होते.
विधानसभा निवडणुकीपूर्वी दोन्ही काँग्रेसमध्ये निराशेचे वातावरण होते. पुन्हा पाणिपत होईल, असेच सर्वांना वाटत होते. परंतु ज्या पद्धतीने नागपुरात काँग्रेस आघाडीचे चार आमजदार निवडून आले, त्यामुळे दोन्ही काँग्रेमध्ये नवचैतन्य संचारले आहे. आपल्या भाषणात नेत्यांनी शरद पवार यांना विजयाचे श्रेय देत यापुढे सर्व जण बेकीने नव्हे तर एकीने लढ,असा संकल्प केला. याची सुरुवात सुरुवातीलाच अनिल देशमुख यांच्या पुढकाराने झाली. त्यांनी विलास मुत्तेमवार यांचे स्वागत सतीश चतुर्वेदी यांच्याकडून तर चतुर्वेदी यांचे स्वागत मुत्तेमवार यांच्या हस्ते करून घेतले. उपस्थितांनीही टाळ्या वाजवून स्वागत केले.
यावेळी विकास ठाकरे, नितीन राऊत, गिरीश पांडव, पुरुषोत्तम हजारे, बंटीस शेळके, अनिल देशमुख, राजू पारवे, सुरेश भोयर, विजय घोडमारे यांचा सत्कार करण्यात आला. दोन उमेदवार वैयक्तिक कारणामुळे येऊ शकले नाही.