लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: धानाच्या एचएमटी वाणाचे संशोधक दादाजी खोब्रागडे यांना श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी अ.भा. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आज, बुधवारी नागभीड तालुक्यातील नांदेड या गावी येत आहेत. तेथे ते 'चौपाल पे चर्चा' करून शेतकऱ्यांशी संवादही साधणार आहेत. त्यांचा हा दौरा हवाई असणार आहे. मात्र, त्यांचे स्वागत करण्यासाठी नागपुरातील पदाधिकारी व कार्यकर्ते उत्सुक असून राहुल गांधी यांनी स्वागत स्वीकारण्यासाठी नागपूर विमानतळाबाहेर यावे, अशी विनंती स्थानिक काँग्रेस पदाधिकाऱ्यांतर्फे प्रदेशाध्यक्षांना करण्यात आली आहे.राहुल गांधी सकाळी १० वाजता विशेष विमानाने नागपूर विमानतळावर पोहचतील. तेथून ते सकाळी १०.२० वाजता हेलिकॉप्टरने नांदेडसाठी रवाना होतील व १०.५० वाजता पोहचतील. त्यांच्यासोबत प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण, विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील असतील. हवामान खराब असले तरच ते गाडीने रवाना होतील. हेलिकॉप्टरने रवाना झाले तर राहुल गांधी विमानतळाच्या बाहेर येणार नाहीत. निवडक नेत्यांना आत भेटीसाठी प्रवेश दिला जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांचा मोठा हिरमोड झाला आहे. राहुल गांधी यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांचा हा पहिलाच दौरा आहे. ते पूर्ण ताकदीने भाजपासह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी लढा देत आहेत. त्यामुळे नागपुरात त्यांचे जंगी स्वागत करण्यासाठी काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते उत्सुक आहेत. राहुल गांधी हेलिकॉप्टरने जाणार असतील तरी त्यांनी काही मिनिटांसाठी विमानतळाबाहेर यावे व कार्यकर्त्यांना भेटावे, अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे.कार्यकर्त्यांच्या भावना विचारात घेता राहुल गांधी यांच्या स्वागतासाठी विमानतळावर गोळा होण्याचे आवाहन शहर काँग्रेसतर्फे कार्यकर्त्यांना करण्यात आले आहे. ढोलताशांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. शेकडो कार्यकर्ते भेटीसाठी ताटकळत असताना राहुल गांधी विमानतळाबाहेर आले नाही तर कार्यकर्त्यांचा हिरमोड होऊन चुकीचा संदेश जाण्याची शक्यता आहे.
राहुल गांधींच्या भेटीसाठी काँग्रेसजनांचे साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 10:02 PM
धानाच्या एचएमटी वाणाचे संशोधक दादाजी खोब्रागडे यांना श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी अ.भा. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आज, बुधवारी नागभीड तालुक्यातील नांदेड या गावी येत आहेत. तेथे ते 'चौपाल पे चर्चा' करून शेतकऱ्यांशी संवादही साधणार आहेत. त्यांचा हा दौरा हवाई असणार आहे. मात्र, त्यांचे स्वागत करण्यासाठी नागपुरातील पदाधिकारी व कार्यकर्ते उत्सुक असून राहुल गांधी यांनी स्वागत स्वीकारण्यासाठी नागपूर विमानतळाबाहेर यावे, अशी विनंती स्थानिक काँग्रेस पदाधिकाऱ्यांतर्फे प्रदेशाध्यक्षांना करण्यात आली आहे.
ठळक मुद्देविमानतळावर स्वागतासाठी कार्यकर्ते सज्ज : स्थानिक पदाधिकाऱ्यांची प्रदेशाध्यक्षांना विनंती