शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
2
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
3
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
4
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
5
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
6
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
7
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
8
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
9
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
10
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
11
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
12
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
13
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
14
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
15
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
16
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
17
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
18
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
19
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...

मोदी यांच्याविरोधात ५ ते ९ एप्रिल दरम्यान काँग्रेसची विदर्भात शेतकरी पदयात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2018 11:20 AM

शेतकऱ्यांचा विश्वासघात केल्याने मोदी यांच्याविरोधात काँग्रेसतर्फे ५ ते ८ एप्रिल दरम्यान पांढरकवडा ते दाभाडी अशी ९० किलोमीटरची शेतकरी पदयात्रा काढणार असल्याची माहिती माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देशिवाजीराव मोघे पांढरकवडा ते दाभाडी ९० कि.मी.ची पदयात्रा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : २०१४ च्या लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यवतमाळ जिल्ह्यातील दाभाडी येथे ‘चाय पे चर्चा’ कार्यक्रमाच्या माध्यमातून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे देशभरातील शेतकऱ्यांशी संवाद साधला होता. देशात भाजपाची सत्ता आल्यास शेतीमालाला योग्य भाव, शेतकऱ्यांना सक्षम बनविणे, युवकांना रोजगार अशा विविध प्रकारची १९ आश्वासने दिली होती. परंतु गेल्या चार वर्षात यातील एकही आश्वासन पूर्ण केलेले नाही. शेतकऱ्यांचा विश्वासघात केल्याने मोदी यांच्याविरोधात काँग्रेसतर्फे ५ ते ८ एप्रिल दरम्यान पांढरकवडा ते दाभाडी अशी ९० किलोमीटरची शेतकरी पदयात्रा काढणार असल्याची माहिती माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.चाय पे चर्चा कार्यक्रमाच्या माध्यमातून मोदी यांनी शेतमालाला उत्पादन खर्च अधिक ५० टक्के नफा, कृषी व्याजदरात सवलत, कापसाला योग्य भाव व स्थानिकांना रोजगार, सोयाबीन शेती करणाऱ्यांना अधिक लाभ होईल, अशी व्यवस्था करणे, कृषी क्षेत्रासाठी पायाभूत सुविधा, देशभरात गोदाम व कोल्ड स्टोअरेजचे जाळे निर्माण करणे, पीक विमा घेण्यासाठी तात्काळ कर्ज, आत्महत्या रोखण्यासाठी शेतकऱ्यांना मदत, देशात कृषी क्रांती आणली जाईल. गुजरातमधील सरदार सरोवर प्रकल्पाला गेट लावून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना ४०० कोटींची मोफत वीज देण्यात येईल, अशा प्रकारची आश्वासने दिली होती.मोदी यांच्या आश्वासनावर विश्वास ठेवून शेतकऱ्यांनी भाजपाला मते दिली. परंतु सत्तारूढ होताच भाजपाला आश्वासनांचा विसर पडला आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढलेल्या आहेत. यवतमाळ, चंद्रपूर व अदिलाबाद या तीन जिल्ह्यातील पाच लाख एकर शेतीला पाणी देण्याची क्षमता असलेला निम्न पैनगगां प्रकल्प २०१४ पासून बंद पडला आहे. याचा निषेध म्हणून ही पदयात्रा काढली जाणार आहे. पदयात्रेदरम्यान आयोजित जाहीर सभांना माजी खासदार नाना पटोले, नरेश पुगलिया, आ. विजय वडेट्टीवार, खा. राजीव सातव, शेतकरी नेते खा. राजू शेट्टी, आ. नौशाद सोलंकी आदी मान्यवर मार्गदर्शन करणार असल्याची माहिती शिवाजीराव मोघे यांनी दिली.

टॅग्स :Farmerशेतकरी