सरकारच्या विरोधात काँग्रेसचे नागपुरात शहरभर आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2019 10:00 PM2019-09-11T22:00:31+5:302019-09-11T22:01:57+5:30
केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे देशभर आर्थिक मंदीचे वातावरण निर्माण झाले आहे. आर्थिक मंदीमुळे अनेक उद्योगधंदे,व्यवसाय आणि सेवा ठप्प झाल्या आहेत.सरकारच्या या चुकीच्या धोरणाविरुद्ध काँग्रेसतर्फे शहरभर आंदोलन करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे देशभर आर्थिक मंदीचे वातावरण निर्माण झाले आहे. आर्थिक मंदीमुळे अनेक उद्योगधंदे,व्यवसाय आणि सेवा ठप्प झाल्या आहेत. त्याचा विपरीत परिणाम महाराष्ट्रातील युवक, शेतकरी, शेतमजूर तसेच समाजातील गरीब, मागास, अल्पसंख्याक आणि दारिद्र्य रेषेखालील लोकांना सहन करावा लागत आहे, सरकारच्या या चुकीच्या धोरणाविरुद्ध काँग्रेसतर्फे शहरभर आंदोलन करण्यात आले.
नागपूर शहर (जिल्हा) काँग्रेस कमेटीच्या वतीने शहर अध्यक्ष श्री. विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात म.प्र.कॉ.कमेटीचे सचिव विशाल मुत्तेमवार, अॅड.अभिजित वंजारी, उपाध्यक्ष प्रा.दिनेश बानाबाकोडे, जयंत लुटे, रमन पैगवार, रजत देशमुख, मोतीराम मोहाडीकर, दिनेश तराळे, पंकज थोरात, पंकज निघोट, निर्मला बोरकर, अनिल पांडे, प्रवीण गवरे, विश्वेश्वर अहिरकर, राजकुमार कमनानी, देवेद्रसिंग रोटेले, प्रमोदसिंग ठाकूर, सूरज आवळे, इर्शाद मलिक, सुनीता ढोले, अब्दुल शकील, गोपाल पट्टम, इर्शाद अली व इतर शहर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आपआपल्या ब्लॉकमध्ये आंदोलन केले. रिझर्व बँकेने केंद्र सरकारला १ लाख ७६ हजार कोटी रुपये देण्याचा घेतलेला निर्णय हा देशासमोरील आर्थिक संकटाची पुष्टी करणारा असून अशा प्रकारच्या निर्णयामुळे भविष्यात देशासमोर यापेक्षाही मोठे आर्थिक संकट उभे राहणार असल्याची भीती यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी उपस्थित केली. नोकऱ्यांमधील रिक्त पदे भरून युवकांना रोजगार द्यावा, अशी मागणी करीत सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. आंदोलनामध्ये अशोक निखाडे, किशोर गीद, मुजाहीद खान, रमेश निमजे, निशा खान, राहुल खापेकर, महेश श्रीवास, अनिल केसरवानी, सचिन इंगोले, सुरेंद्र रॉय, बालकदास हेडाऊ, मुजाहीद खान, दीनानाथ खरबीकर, ममता तोमर, प्रकाश उमरेडकर, मुजीब खान, राजा चिलाटे, फारुख मलिक, बंडू नगरारे, इजहार अहमद, हसीन अहमद, रिजवान अंसारी, विकास शेडे, मिलिंद कांबळे, शेख हुसेन, अखिल खान, तुफेल अंसारी, विशाल बन्सोड, अदमत अली, शकील अंसारी, शेख समीर, नवाब कुरैशी, खालिद अंसारी, अलिमुद्दीन अंसारी, राकेश वल्का आदी सहभागी झाले होते.