शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

सरकारच्या विरोधात काँग्रेसचे नागपुरात शहरभर आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2019 10:00 PM

केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे देशभर आर्थिक मंदीचे वातावरण निर्माण झाले आहे. आर्थिक मंदीमुळे अनेक उद्योगधंदे,व्यवसाय आणि सेवा ठप्प झाल्या आहेत.सरकारच्या या चुकीच्या धोरणाविरुद्ध काँग्रेसतर्फे शहरभर आंदोलन करण्यात आले.

लोकमत  न्यूज  नेटवर्क नागपूर : केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे देशभर आर्थिक मंदीचे वातावरण निर्माण झाले आहे. आर्थिक मंदीमुळे अनेक उद्योगधंदे,व्यवसाय आणि सेवा ठप्प झाल्या आहेत. त्याचा विपरीत परिणाम महाराष्ट्रातील युवक, शेतकरी, शेतमजूर तसेच समाजातील गरीब, मागास, अल्पसंख्याक आणि दारिद्र्य रेषेखालील लोकांना सहन करावा लागत आहे, सरकारच्या या चुकीच्या धोरणाविरुद्ध काँग्रेसतर्फे शहरभर आंदोलन करण्यात आले.नागपूर शहर (जिल्हा) काँग्रेस कमेटीच्या वतीने शहर अध्यक्ष श्री. विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात म.प्र.कॉ.कमेटीचे सचिव विशाल मुत्तेमवार, अ‍ॅड.अभिजित वंजारी, उपाध्यक्ष प्रा.दिनेश बानाबाकोडे, जयंत लुटे, रमन पैगवार, रजत देशमुख, मोतीराम मोहाडीकर, दिनेश तराळे, पंकज थोरात, पंकज निघोट, निर्मला बोरकर, अनिल पांडे, प्रवीण गवरे, विश्वेश्वर अहिरकर, राजकुमार कमनानी, देवेद्रसिंग रोटेले, प्रमोदसिंग ठाकूर, सूरज आवळे, इर्शाद मलिक, सुनीता ढोले, अब्दुल शकील, गोपाल पट्टम, इर्शाद अली व इतर शहर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आपआपल्या ब्लॉकमध्ये आंदोलन केले. रिझर्व बँकेने केंद्र सरकारला १ लाख ७६ हजार कोटी रुपये देण्याचा घेतलेला निर्णय हा देशासमोरील आर्थिक संकटाची पुष्टी करणारा असून अशा प्रकारच्या निर्णयामुळे भविष्यात देशासमोर यापेक्षाही मोठे आर्थिक संकट उभे राहणार असल्याची भीती यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी उपस्थित केली. नोकऱ्यांमधील रिक्त पदे भरून युवकांना रोजगार द्यावा, अशी मागणी करीत सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. आंदोलनामध्ये अशोक निखाडे, किशोर गीद, मुजाहीद खान, रमेश निमजे, निशा खान, राहुल खापेकर, महेश श्रीवास, अनिल केसरवानी, सचिन इंगोले, सुरेंद्र रॉय, बालकदास हेडाऊ, मुजाहीद खान, दीनानाथ खरबीकर, ममता तोमर, प्रकाश उमरेडकर, मुजीब खान, राजा चिलाटे, फारुख मलिक, बंडू नगरारे, इजहार अहमद, हसीन अहमद, रिजवान अंसारी, विकास शेडे, मिलिंद कांबळे, शेख हुसेन, अखिल खान, तुफेल अंसारी, विशाल बन्सोड, अदमत अली, शकील अंसारी, शेख समीर, नवाब कुरैशी, खालिद अंसारी, अलिमुद्दीन अंसारी, राकेश वल्का आदी सहभागी झाले होते.

टॅग्स :congressकाँग्रेसagitationआंदोलन