लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : काँग्रेससकडून जातीपातीच्या राजकारणावर भर देण्यात येत आहे. अशा राजकारणातून काँग्रेसचे नेते समाजात दहशत पसरविण्याचे काम करत असल्याचा आरोप केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदामंत्री नितीन गडकरी यांनी केला. आगामी लोकसभा निवडणुकांच्या तयारीला डोळ्यासमोर ठेवून आयोजित भाजपाच्या उत्तर नागपूर ‘पेजप्रमुख’ संमेलनात बोलत होते.वैशालीनगर येथील मैदानावर झालेल्या या संमेलनात राज्याचे ऊर्जामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, शहराध्यक्ष आ.सुधाकर कोहळे, आ. डॉ. मिलिंद माने, मनपाच्या स्थायी समितीचे अध्यक्ष विक्की कुकरेजा, अशोक मेंढे, संदीप जाधव, किशोर पलांदूरकर, भोजराज डुंबे, घनश्याम कुकरेजा, सुनिल मित्रा, प्रभाकर येवले, नवनीत सिंह तुली, शिवनाथ पांडे, महेंद्र धनविजय उपस्थित होते. कार्यकर्त्यांच्या भरवशावरच २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकांत विजय मिळाला होता व नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले होते. यानंतर शहरात युद्धपातळीवर विकासकामांना सुरुवात झाली. ५५ महिन्यांत शहराचा चेहरामोहरा बदलला आहे. समाजातील अंतिम व्यक्तीला लाभ पोहोचविला जात आहे. मात्र, काँंग्रेससह इतर विरोधी पक्ष जातीवादाला प्रोत्साहन देऊन असुरक्षिततेची भावना निर्माण करत आहेत, असे गडकरी यांनी प्रतिपादन केले. निवडणुकांच्या काळात देशाच्या इतर भागातही प्रचारासाठी जावे लागणार आहे. अशा स्थितीत ‘पेजप्रमुख’ तसेच पक्षातील इतर पदाधिकाऱ्यांवरच निवडणुकीची जबाबदारी राहणार आहे, असेदेखील ते म्हणाले.
काँग्रेस जातीपातीच्या राजकारणातून दहशत पसरवत आहे : नितीन गडकरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2019 12:47 AM
काँग्रेससकडून जातीपातीच्या राजकारणावर भर देण्यात येत आहे. अशा राजकारणातून काँग्रेसचे नेते समाजात दहशत पसरविण्याचे काम करत असल्याचा आरोप केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदामंत्री नितीन गडकरी यांनी केला. आगामी लोकसभा निवडणुकांच्या तयारीला डोळ्यासमोर ठेवून आयोजित भाजपाच्या उत्तर नागपूर ‘पेजप्रमुख’ संमेलनात बोलत होते.
ठळक मुद्देभाजपाच्या उत्तर नागपूर ‘पेजप्रमुख’ संमेलनाचे आयोजन