अध्यक्षांकडून विरोधकांची मुस्काटदाबी - नाना पटोले
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2022 10:26 AM2022-12-30T10:26:22+5:302022-12-30T10:27:18+5:30
Maharashtra Winter Session 2022 : गेंड्याच्या कातडीपेक्षाही जाड असं हे सरकार
नागपूर : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणलाय. पण हा अविश्वास प्रस्ताव वर्षाभराच्या आत आणता येत नाही असे सत्ताधाऱ्यांकडून दाखले दिले जात आहेत. सहा महिन्यांपूर्वी मांडलेला विश्वास प्रस्ताव होता. तर आता अविश्वास प्रस्ताव आम्ही नियमानुसारच आणला आहे, असे पटोले म्हणाले.
हे सरकार प्रत्येक पावलावर घाबरलेलं आहे. दोन आठवड्यात सभागृहाच्या कामकाजात विरोधकांना जनतेचे प्रश्न मांडू देण्यात आले नाहीत. आमची मुस्काटदाबी केली. हे अधिवेशन पर्यटनासारखं झालयं. या सरकारकडे मंत्री नाहीत, दोन हजार लक्षवेधी मांडल्या असं सांगितलं जातयं. पण लक्षवेधींना उत्तरं देताना मंत्री नाहीत. गेल्या दोन अधिवेशनात ७८ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या मांडल्यात, त्याला काही आधार नाही. राज्यपाल भवनात नियमबाह्य काम सुरू आहे. हे विषय अंतिम आठवडा प्रस्ताव सादर करताना मांडले. त्याचे काही उत्तर नाही. गेंड्याच्या कातडीपेक्षाही जाड असं हे सरकार असल्याची टीका पटोले यांनी यावेळी केली.