विदर्भात पाय रोवण्यासाठी काँग्रेसची धडपड; प्रदेश कार्यकारिणीची आज नागपुरात बैठक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2023 10:32 AM2023-01-10T10:32:34+5:302023-01-10T10:41:00+5:30

तीन माजी मुख्यमंत्री येणार

Congress to hold meetings of its extended state executive in Nagpur on 10th jan | विदर्भात पाय रोवण्यासाठी काँग्रेसची धडपड; प्रदेश कार्यकारिणीची आज नागपुरात बैठक

विदर्भात पाय रोवण्यासाठी काँग्रेसची धडपड; प्रदेश कार्यकारिणीची आज नागपुरात बैठक

googlenewsNext

नागपूर : भाजपने महाराष्ट्रात लोकसभेसाठी ‘मिशन ४५’ ची घोषणा करताच काँग्रेसच्याही हालचाली सुरू झाल्या आहेत. राज्यात सत्तेच्या आसपास पोहोचायचे असेल तर विदर्भातील जास्तीत जास्त जागा जिंकण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळेच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आता विदर्भावर अधिक लक्ष केंद्रित करीत प्रदेश काँग्रेसच्या विस्तारित कार्यकारिणीची बैठक मंगळवारी नागपुरात आयोजित केली आहे. या बैठकीत ‘हाथ से हाथ जोडो’ अभियानासह राज्यातील समस्या, संघटनात्मक बांधणी व आगामी निवडणुकांवरही चर्चा होणार आहे.

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली व प्रभारी एच. के. पाटील तसेच ‘हाथ से हाथ जोडो’ अभियानाचे महाराष्ट्र प्रभारी, माजी केंद्रीय मंत्री पल्लम राजू यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक होत आहे. काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, देशाचे माजी गृहमंत्री व माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, प्रदेश कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरे, नसीम खान, आ. प्रणिती शिंदे, आ. कुणाल पाटील, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व सहप्रभारी संपतकुमार, आशिष दुआ, सोनल पटेल, आमदार, खासदार व प्रदेश पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष आघाडी संघटनांचे प्रदेशाध्यक्ष या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

महागाई, बेरोजगारी, राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारचा भ्रष्ट कारभार, आगामी विधान परिषद निवडणुका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका व त्यासाठी पक्षाची रणनीती, भारत जोडो यात्रेचा संदेश राज्यभर पोहोचविण्यासाठी विशेष अभियान राबविण्याबाबत, तसेच हाथ से हाथ जोडो अभियानाबाबत या बैठकीत चर्चा केली जाणार आहे.

काँग्रेस आमदार देणार सूरजागड प्रकल्पाला भेट

- गडचिरोली जिल्ह्यातील सूरजागडच्या खाण प्रकल्पाबाबत स्थानिक नागरिकांच्या तक्रारी असून, रोष आहे. याची दखल घेत बुधवारी सकाळी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात काँग्रेस आमदारांचे शिष्टमंडळ सुरजागडसाठी रवाना होणार आहे.

Web Title: Congress to hold meetings of its extended state executive in Nagpur on 10th jan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.