ठळक मुद्देगणराज्यदिनी राजकीय जुगलबंदी
लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गणराज्यदिनी भाजपा व काँग्रेस या दोन प्रमुख पक्षांमध्ये राजकीय जुगलबंदी रंगल्याची पाहायला मिळाली. भाजपाने तिरंगा यात्रा काढत संविधानाला कुणीही बदलू शकत नसल्याचे सांगत काही घटक समाजात फूट पाडण्यासाठी अशा अफवा पसरवीत असल्याचा आरोप केला. तर काँग्रेसने संविधान बचाव रॅली काढत संविधान बदलण्याचे कारस्थान करणाऱ्यांविरोधात लढा आणखी तीव्र करण्याचा इशारा दिला.भाजपातर्फे सकाळी १० वाजता टिळक पुतळा चौकापासून ते संविधान चौकापर्यंत तिरंगा यात्रा काढण्यात आली. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, शहर अध्यक्ष आ. सुधाकर कोहळे, राज्यमंत्री सुधाकर देशमुख, खासदार डॉ. विकास महात्मे, आ. अनिल सोले, आ. गिरीश व्यास, डॉ. उपेंद्र कोठेकर, शिवानी दाणी, संजय फांजे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ५०० फुटांचा तिरंगा लहरवीत आग्याराम देवी मंदिर, कॉटन मार्केट, व्हेरायटी चौक, झिरो माईल्समार्गे संविधान चौकात पोहोचले. येथे डॉ. बाबासाहेब अंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले.यावेळी कोहळे म्हणाले, देशाच्या स्वातंत्र्यासाठी क्रांतिकारकांनी प्राणांची आहुती दिली. आज तिरंगा हा राष्ट्रध्वज आपल्या देशाची आन, बान व शान आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानामुळे देशाला दिशा मिळाली आहे. हे संविधान कुणीही तोडू शकत नाही. मात्र, सत्तेची लालसा असलेले काही घटक काही सामाजाकि तत्त्वांशी हातमिळवणी करून अफवा पसरवीत आहेत. समाज तोडण्याचे काम करीत आहेत. भाजपाने सदैव एकता व अखंडतेचा पुरस्कार केला आहे. समाज जोडण्याचे काम केले आहे, असेही त्यांनी सांगितले. याप्रसंगी जमाल सिद्दीकी, उपमहापौर दीपराज पार्डीकर, सुधीर हिरडे, संदीप जाधव, दयाशंकर तिवारी, भोजराज डुंबे, धर्मपाल मेश्राम, अर्चना डेहनकर, कीर्तिदा अजमेरा, बंडू राऊत, किशन गावंडे, अब्दुल कदीर, नरेश जुमानी, वंदना यंगटवार, किशोर पलांदूरकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.काँग्रेसतर्फे संविधान चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून संविधान बचाव रॅली काढण्यात आली. माजी मंत्री विलास मुत्तेमवार, शहर अध्यक्ष विकास ठाकरे, अभिजित वंजारी, उमाकांत अग्निहोत्री, अतुल लोंढे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते ‘संविधान बचाव’चे फलक घेऊन नारे देत व्हेरायटी चौकात पोहोचले. येथे महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले. यावेळी शहर अध्यक्ष विकास ठाकरे म्हणाले, काँग्रेसने नेहमी संविधानाचे पालन व संरक्षण केले आहे. काही घटक संविधान बदलण्याचा व लोकशाही संपविण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, काँग्रेस संविधानाच्या रक्षणासाठी आपला लढा अधिक तीव्र करेल, असा इशारा त्यांनी दिला.रॅलीमध्ये माजी आ. एस.क्यू. जमा, सुरेश भोयर, जयंत लुटे, बंडोपंत टेंभूर्णे, संदेश सिंगलकर, रमण पैगवार, रत्नाकर जयपूरकर, संजय महाकाळकर, प्रशांत धवड, वासुदेव ढोके, रामगोविंद खोब्रागडे, प्रज्ञा बडवाईक, डॉ. रिचा जैन, इर्शाद अली, अतिक कुरेशी, महेश श्रीवास, अजय नासरे, अॅड. अक्षय समर्थ, मुक्तार अन्सारी, पंकज निघोट, रेखा बाराहाते, अंबादास गोंडाणे, अब्दुल शकील, संजय सरायकर, राजेश कुंभलकर, रवी गाडगे, मोंटी गडेचा, हाजी समीर, रिंकू जैन, विवेक निकोसे, दिनेश वाघमारे, आकाश तायवाडे, वैभव काळे, डॉ. प्रकाश ढगे आदींनी भाग घेतला.