लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागलेल्या कॉंग्रेस पार्टीने ख्रिश्चन समुदायाला आकर्षित करण्यास सुरुवात केली आहे. याच मालिकेत कॉंग्रेस पार्टीशी जुळलेल्या ख्रिश्चन को-आॅर्डिनेशन कमिटीच्यावतीने शनिवारी मसीही अधिकार संमेलनाचे आयोजन केले आहे. संमेलनात सहभागी होण्यासाठी कॉंग्रेसचे नेता मल्लिकार्जुन खरगे यांचे शुक्रवारी रात्री नागपुरात आगमन झाले.मेकोसाबाग येथील मॅथाडिस्ट ग्राऊंडमध्ये १ डिसेंबरला सकाळी ११ वाजता सुरु होत असलेल्या या संमेलनात खरगे यांच्याशिवाय कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, कॉंग्रेसचे सचिव आशिष दुवा, रावसाहेब शेखावत, प्रदेश महिला कॉंग्रेसच्या अध्यक्ष चारुलता टोकस सहभागी होतील. संमेलनासाठी कॉंग्रेसच्या अल्पसंख्यांक कमिटीने व्यापक तयारी केलेली आहे. कमिटीचे उपाध्यक्ष अॅड. अनिल थॉमस यांच्या नेतृत्वाखाली विविध समित्यांचे गठन करण्यात आले आहे. विजय बारसे, पास्टर एलिझाबेथ मार्टिन आणि विजय फर्नांडिस यांना संयोजक करण्यात आले आहे. संमेलनात महाराष्ट्रातून ख्रिश्चन धर्मगुरु आणि अनुयायी सहभागी होणार आहेत.प्रतिनिधित्व देण्याची मागणीसंमेलनासाठी ख्रिश्चन को-आॅर्डिनेशन कमिटीने मागण्यांचे पत्र तयार केले आहे. पत्रात समाजाला निवडणुकीत प्रतिनिधित्व देण्याची तसेच राज्यसभा आणि विधान परिषदेत निवड करण्याची प्रमुख मागणी आहे. याशिवाय अर्थसंकल्पात वेगळी तरतूद, युपीएससीसाठी नि:शुल्क प्रशिक्षण देण्याच्या मागण्याही करण्यात आल्या आहेत.
ख्रिश्चन समुदायाला आकर्षित करण्यासाठी कॉंग्रेसचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2018 1:30 AM
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागलेल्या कॉंग्रेस पार्टीने ख्रिश्चन समुदायाला आकर्षित करण्यास सुरुवात केली आहे. याच मालिकेत कॉंग्रेस पार्टीशी जुळलेल्या ख्रिश्चन को-आॅर्डिनेशन कमिटीच्यावतीने शनिवारी मसीही अधिकार संमेलनाचे आयोजन केले आहे. संमेलनात सहभागी होण्यासाठी कॉंग्रेसचे नेता मल्लिकार्जुन खरगे यांचे शुक्रवारी रात्री नागपुरात आगमन झाले.
ठळक मुद्देआज मसीही अधिकार संमेलन : मल्लिकार्जुन खरगे नागपुरात दाखल