“लोकशाही वाचवायला लढत आहोत, तीन राज्ये जिंकली असतील पण...”: विजय वडेट्टीवार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2023 05:17 PM2023-12-11T17:17:20+5:302023-12-11T17:18:48+5:30

Congress Vijay Wadettiwar: शेतकऱ्यांना मदत करण्याची या सरकारची ऐपत नाही. संपूर्ण कर्जमाफी मिळाल्याशिवाय विधानसभेतून पळ काढता येणार नाही, अशी टीका करण्यात आली.

congress vijay wadettiwar criticised state govt over farmers issue and other various issues in hallabol morcha | “लोकशाही वाचवायला लढत आहोत, तीन राज्ये जिंकली असतील पण...”: विजय वडेट्टीवार

“लोकशाही वाचवायला लढत आहोत, तीन राज्ये जिंकली असतील पण...”: विजय वडेट्टीवार

Congress Vijay Wadettiwar: शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी, सरकारी सेवेत कर्मचारी भरती करावी,  शेतमालाला योग्य भाव मिळावा, कांदा निर्यात बंदी उठवावी,  इथेनॉल निर्मितीवर लावलेली बंदी उठवावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी हल्लाबोल मोर्चात केली. या हल्लाबोल मोर्चात काँग्रेसचे नेते, आमदार, खासदार, महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, एनएसयुआय, विविध सेल व विभागाचे हजारो पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. 

नागपूर इथे होत असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने 'हल्लाबोल' मोर्चाचे आयोजन केले होते. यावेळी बोलताना विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांनी शेतकऱ्यांना मदत करण्याची या सरकारची ऐपत नसल्याची टीका केली. शासन आपल्या दारीच्या नावाखाली करोडो रुपये खर्च केले जातात, पण शेतकऱ्यांना मात्र वेळीच मदत करत नाही अशी टीका वडेट्टीवार यांनी केली. शेतकरी, कष्टकरी, तरुणांच्या  मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही असे  विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी ठणकावले.

हे सरकार तीन तीघडा काम बिघाडा आहे

तुम्ही तीन राज्य जिंकले असाल पण आज या मोर्चातील उपस्थिती तुम्हाला महाराष्ट्रातून  हाकलून लावल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. हे सरकार तीन तीघडा काम बिघाडा आहे. पहिले अलिबाबा चाळीस चोर होते आता दोन अलिबाबा ८० चोर आहेत आणि ते  महाराष्ट्र लुटायला निघाले म्हणून हल्लाबोल  आम्ही करत आहोत. राज्यात  बळीराजा  प्रचंड अडचणीत आहे,  शेतमालाला भाव नाही, सरकार मदतीच्या कोरड्या घोषणा करत आहे. ट्रिपल इंजिन सरकार  जनतेच्या या मूलभूत प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे, या शब्दांत विजय वडेट्टीवार यांनी निशाणा साधला.

संपूर्ण कर्जमाफी मिळाल्याशिवाय विधानसभेतून पळ काढता येणार नाही

सरकार झोपले आहे. गेले तीन दिवस विरोधक धान, कापूस, सोयाबीन, संत्रा, द्राक्ष, कांदा प्रश्न उपस्थित करत आहेत.  शेतकरी या अधिवेशनाकडे आशा लावून बघत आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळाल्याशिवाय विधानसभेतून पळ काढता येणार नाही असं म्हणत वडेट्टीवार म्हणाले. शेतकऱ्यांना न्याय द्या, नाहीतर शेतकरी ,शेतमजूर या सरकारला धडा शिकवेल,नियमित कर्ज भरणाऱयांना आम्ही दिलासा दिला पण हे ट्रिपल इंजिन सरकार  मदतीच्या कोरड्या घोषणा करत आहेत, त्यांनी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे, असे विजय वडेट्टीवार म्हणाले. 

दरम्यान, थापाड्या सरकारने  ७५ हजार भरती करण्याची घोषणा केली त्याचे काय झाले असा सवाल उपस्थित करत वडेट्टीवार यांनी सरकारवर हल्लाबोल चढवला. शिक्षक भरती नाही, तरुणाच्या हाताला काम नाही, महाराष्ट्रातील कोणताही घटक सुखी नाही. या सरकारमध्ये भांडण सुरू आहे.  राज्यातील मूळ प्रश्नांवरून लक्ष हटवावे म्हणून दोन समाजात  भांडण लावण्याचं काम करीत असल्याची टीका वडेट्टीवार यांनी केली .
 

Web Title: congress vijay wadettiwar criticised state govt over farmers issue and other various issues in hallabol morcha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.