शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-चीन सीमेवर दाेन्ही सैन्य माघारीस सुरुवात; २८-२९ ऑक्टाेबरपर्यंत प्रक्रिया हाेणार पूर्ण!
2
आजचे राशीभविष्य: ३ राशींना अनुकूल, आर्थिक लाभ संभवतात; सुखाचा, शांततेचा दिवस
3
घोळ संपेना! मविआचा नवा फॉर्म्युला, तिघांना प्रत्येकी ९० जागा; १८ जागा मित्र पक्षांना
4
मस्का की मस्करी? जगाला ऊठसूट लोकशाही मूल्यांचा डोस देणाऱ्या अमेरिकेत चाललंय काय?
5
मिलिंद देवरा यांना शिंदेसेनेकडून उमेदवारी? वरळीतून आदित्य ठाकरेंच्या विरोधात रिंगणात
6
विशेष लेख: वाट्टेल ते करून लग्न करा, मूल जन्माला घाला! जन्मदर वाढविण्यासाठी नवीन टूम!
7
भ्रष्टाचार निर्मूलन: संवेदनशील सत्यनिष्ठा हवी! काम लवकर होण्यासाठी 'किड' वाढवू नका!
8
ठाण्यात मनसे-महायुती छुपी युती? ठाणे, कल्याण, डोंबिवलीत निवडणूक लढण्याची शक्यता धूसर
9
१३८ कोटींचे सोने पकडले; विशेष चारचाकी वाहनावर पुण्यात कारवाई; कायदेशीर प्रक्रिया सुरू
10
भाजप, शिंदेसेनेच्या तीव्र विरोधामुळे नवाब मलिक यांना अद्याप तरी उमेदवारी नाहीच!
11
विधानसभा निवडणूक: पोलिसांच्या नाकाबंदीत खालापूर टोल नाक्यावर दहा कोटींची चांदी जप्त
12
३६ जागांवर महायुती अन् मविआचेही ‘वेट अँड वॉच’; एकमेकांच्या उमेदवारांची प्रतीक्षा
13
राजकारणातील सर्वच पुतण्यांचा DNA एकसारखाच, अडचणीत आणाल तर...- छगन भुजबळ
14
राहुल नार्वेकरांच्या मालमत्तेत चार कोटींची वाढ; पाच वर्षात आशिष शेलारांची संपत्तीत किती वाढली?
15
रांगोळीवरही निवडणुकीचा रंग! पालघरमधील सफाळेत मतदान जनजागृतीचे अनोखे आवाहन
16
जयश्री थोरातांवर बोलताना भाजपा नेत्याची जीभ घसरली; संगमनेरमध्ये तणाव, वाहनांची तोडफोड
17
तुला नाउमेद करणार नाही; उद्धव ठाकरेंचा नाराज सुधीर साळवींना शब्द, शिवडीतील बंड थंड
18
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, पाहा कुणाला संधी?
19
काँग्रेसला कमी जागा मिळाल्याने राहुल गांधी नाराज; नाना पटोलेंनी सांगितले बैठकीत काय झालं?
20
इन आँखो की मस्ती में... बॉलिवूड गाजवणाऱ्या मराठमोळ्या मृणाल ठाकूरचं 'रॉयल' फोटोशूट (Photos)

“मोठे आकडे सांगून थकले, ट्रिपल इंजिन सरकारकडून शेतकऱ्याची घोर निराशा”: विजय वडेट्टीवार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2023 9:31 PM

Winter Session Maharashtra 2023: राज्यात चाळीस तालुक्यात दुष्काळ जाहीर करतानाही राजकारण करण्यात आले, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली.

Winter Session Maharashtra 2023: अवकाळी आणि दुष्काळी परिस्थितीने शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे.  परंतु अल्पकालीन चर्चेला उत्तर देताना सरकारने शेतकऱ्यांना ठोस काही दिले नाही. हिवाळी अधिवेशनाकडे बळीराजाचे डोळे लागलेले असताना ट्रिपल इंजिन सरकारने जुन्याच घोषणा नव्याने  करून  शेतकऱ्यांची  घोर निराशा केली आहे. शेतकऱ्यांना न्याय न देता अधिवेशनातून पळ काढण्याचा प्रयत्न सरकारने केला, अशी टीका विधानसभा विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

मीडियाशी बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की,  राज्यात चाळीस तालुक्यात दुष्काळ जाहीर करतानाही राजकारण करण्यात आले. सत्ताधाऱ्यांची तोंड बघून चाळीस तालुक्यात  दुष्काळ जाहीर केला. १०२१ मंडळात दुष्काळसदृश्य परिस्थिती घोषित केली. त्यांना कुठल्याही प्रकारच्या मदतीची घोषणा सरकारने केली नाही. पीकविमा संदर्भात शेतकऱ्याला आधार दिला नाही. राज्य आणि केंद्रसरकारने ८ हजार कोटी रुपये प्रीमियमच्या नावाखाली पीकविमा कंपन्यांच्या घशात घातले. अग्रीम म्हणून दोन हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळणार, असे घोषित केले. जवळपास सहा हजार कोटी रुपये पीकविमा कंपन्यांचा घशात घालण्याचे काम सरकारने केले असून यातील वाटा कुणाला मिळणार याच उत्तर सरकारने दिले नाही, असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. 

आघाडी सरकारने धानाला  प्रति क्विंटल ७०० रुपये बोनस दिला  दुष्काळी तालुक्यासाठी २६०० कोटींचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला. १ हजार २१ मंडळाचा प्रस्ताव केंद्राकडे गेला नाही. कारण ते निकष पूर्ण करू शकले नाही. वेळेवर एसडीआरएफ आणि एनडीआरएफच्या निकषांप्रमाणे मंत्रिमंडळाच्या उपसमितीची बैठक मदत व पुनर्वसन खात्याने घ्यायला पाहिजे होती. मात्र ती न घेतल्यामुळे आणि दुष्काळसदृश्य, असा शब्द वापरल्यामुळे मंडळातील शेतकऱ्यांना  मदत  मिळू शकली नाही. आघाडी सरकारने धानाला  प्रति क्विंटल ७०० रुपये बोनस दिला. मात्र  या सरकारनं महाविकास आघाडी सरकारपेक्षा कमी मदत धानाला घोषित केलेली  आहे, असे वडेट्टीवार म्हणाले. 

दरम्यान, सोयाबीन व कापसाला  मदत घोषित केलेली नाही. बोलायला उभे राहिलो असता आम्हाला बोलू दिल नाही. आमचा आवाज दाबला गेला. शेतकरी आत्महत्या होत असताना केवळ घोषणा केल्या. संत्रा, द्राक्ष मदतीबाबत घोषणा केली नाही. यवतमाळ जिल्ह्यातील राठोड शेतकऱ्याचे  उदाहरण दिले असता मुख्यमंत्री म्हणतात १५८३ मदत दिली. यांना ही मदत इतकी मोठी वाटते की पोलिस सुरक्षा द्यावी लागेल. खोटं  रेटून बोलायचे काम सरकार करत असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे.  

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनVijay Vadettiwarविजय वडेट्टीवारcongressकाँग्रेस